जळगाव : उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या क्रीडा स्पर्धांमध्ये नाहाटा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

जळगाव : पुढारी वृत्तसेवा कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्या वतीने शैक्षणिक वर्ष 2021 -22 आणि शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये विविध क्रीडा स्पर्धांमध्ये भुसावळ येथील कला विज्ञान आणि पू. ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयातील क्रीडा विभागात घवघवीत यश संपादन करून एक लाख सात हजार रुपयाचे रोख बक्षीस मिळवलेले आहे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र … The post जळगाव : उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या क्रीडा स्पर्धांमध्ये नाहाटा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे घवघवीत यश appeared first on पुढारी.

जळगाव : उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या क्रीडा स्पर्धांमध्ये नाहाटा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

जळगाव : Bharat Live News Media वृत्तसेवा
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्या वतीने शैक्षणिक वर्ष 2021 -22 आणि शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये विविध क्रीडा स्पर्धांमध्ये भुसावळ येथील कला विज्ञान आणि पू. ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयातील क्रीडा विभागात घवघवीत यश संपादन करून एक लाख सात हजार रुपयाचे रोख बक्षीस मिळवलेले आहे
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्या वतीने शैक्षणिक वर्ष 2021 -22 आणि शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या विविध क्रीडा स्पर्धांमध्ये भुसावळ येथील कला विज्ञान आणि पू. ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयातील क्रीडा विभागातील विद्यार्थ्यांनी मिनी गोल्फ स्पर्धेत चैतन्य राजाराम मसराम – सुवर्णपदक व 15 हजार रुपये रोख, प्रियंका रवींद्र पाटील – सुवर्णपदक व रोख 15 हजार, काजल राजेश बरोथ – रौप्यपदक व 13 हजार रुपये रोख, धनश्री धनराज सपकाळे हिला रौप्यपदक व 13 हजार रुपये रोख, शुभम सुनील वाणी – कांस्यपदक आणि 8000 रुपये रोख, राजश्री मधुकर नाफडे कांस्यपदक व 8000 रुपये रोख देण्यात आले. त्याचप्रमाणे तुषार मिलिंद जाधव, सागर अशोक सोनवणे, मृणालिनी जितेंद्र सिंग, हेमचंद मोहन पाटील, खुशी प्रदीप वाघमारे, शिवानी प्रमोद पाटील या विद्यार्थ्यांना प्रत्येकी 5000 रुपयाचे रोख बक्षीस देण्यात आले. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे भुसावळ अध्यक्ष डॉ. मोहन फालक, सचिव महेश फालक, कोषाध्यक्ष विष्णू चौधरी आणि ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे संजयजी नाहाटा व सर्व पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस .व्ही. पाटील, उपप्राचार्य डॉ. बी .एच. बऱ्हाटे, डॉ. ए .डी. गोस्वामी, क्रीडा संचलक डॉ. आनंद उपाध्याय, श्याम भारंबे आदींनी विद्यार्थ्यांच्या यशाचे  कौतुक करून त्यांना भावी जीवनाच्या शुभेच्छा दिल्या.
हेही वाचा:

टक्केवारीत अडकली ‘सॅनिटरी’ची निविदा; काँग्रेसचा आरोप
द्रुतगती महामार्ग आता आठपदरी; एमएसआरडीसीचा राज्य शासनाकडे प्रस्ताव
पिंपळनेर : साक्रीचे प्रा. नरेंद्र तोरवणे यांचा पानिपत येथे गौरव

Latest Marathi News जळगाव : उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या क्रीडा स्पर्धांमध्ये नाहाटा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे घवघवीत यश Brought to You By : Bharat Live News Media.