छत्रपती संभाजीनगरमध्ये गॅसचा टँकर लिक
छत्रपती संभाजीनगर, Bharat Live News Media वृत्तसेवा : शहरातील वसंतराव नाईक चौकात जालन्याकडे जाणारा भरधाव गॅस टँकर दुभाजकाला धडकल्याने अपघात झाला. त्यामुळे टँकरमधून गॅस गळती सुरू झाली. त्यानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला.
अग्निशामक दल आणि पोलिसांनी वेळीच दाखल होत परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी या रोडवरील वाहतूक थांबविली आहे. तसेच रामगिरी हॉटेल, कॅनॉट परिसर आणि एन ३, एन ४ सिडको या भागात कोणीही गॅस पेटवू नये, असे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात आले आहे. अग्निशामक दलाच्या जवानांनी गॅस लिकेज थांबविण्यात चे प्रयत्न सुरू केले आहेत. पोलीस उपायुक्त नितीन बगाटे यांनी घटनास्थळी दाखल होत या परिस्थितीची पाहणी केली. ही सर्व परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी साडेपाच तास लागतील, असे उपायुक्त बगाटे यांनी सांगितले.
हेही वाचा :
पत्नीसोबत मित्राचे प्रेमसंबंध असल्याचं संशयाचं भूत!
Interim Budget Live | अंतरिम अर्थसंकल्पाच्या प्रती संसदेत दाखल
गुजरातच्या कच्छ भागाला भूकंपाचा धक्का, रिश्टर स्केलवर ४.१ तीव्रता
Latest Marathi News छत्रपती संभाजीनगरमध्ये गॅसचा टँकर लिक Brought to You By : Bharat Live News Media.