बजेटपूर्वी गुंतवणूकदार सावध, सेन्सेक्स, निफ्टी सपाट

पुढारी ऑनलाईन : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज गुरुवारी (दि.१ फेब्रुवारी) संसदेत अंतरिम अर्थसंकल्प सादर करत आहेत. या पार्श्वभूमीवर आज शेअर बाजाराने सावध सुरुवात केली आहे. सुरुवातीच्या व्यवहारातच सेन्सेक्स आणि निफ्टी सपाट पातळीवर खुले झाले. दोन्ही निर्देशांकात किरकोळ घसरण दिसून येत आहे. सेन्सेक्स ७१,७०० वर तर निफ्टी २१,७४१ वर व्यवहार करत आहे. (Stock Market Opening … The post बजेटपूर्वी गुंतवणूकदार सावध, सेन्सेक्स, निफ्टी सपाट appeared first on पुढारी.

बजेटपूर्वी गुंतवणूकदार सावध, सेन्सेक्स, निफ्टी सपाट

Bharat Live News Media ऑनलाईन : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज गुरुवारी (दि.१ फेब्रुवारी) संसदेत अंतरिम अर्थसंकल्प सादर करत आहेत. या पार्श्वभूमीवर आज शेअर बाजाराने सावध सुरुवात केली आहे. सुरुवातीच्या व्यवहारातच सेन्सेक्स आणि निफ्टी सपाट पातळीवर खुले झाले. दोन्ही निर्देशांकात किरकोळ घसरण दिसून येत आहे. सेन्सेक्स ७१,७०० वर तर निफ्टी २१,७४१ वर व्यवहार करत आहे. (Stock Market Opening Bell)
शेअर बाजारात सर्वात जास्त तेजी ऑटो, मीडिया आणि फार्मा सेक्टरमध्ये दिसून येत आहे. तर आयटी सेक्टरवर दबाव आहे.
सेन्सेक्स आज ७१,९९८ वर खुला झाला. पण त्यानंतर तो ७१,७०० पर्यंत खाली आला. सेन्सेक्सवर एम अँड एम, मारुती, एनटीपीसी, टाटा मोटर्स हे हिरव्या रंगात खुले झाले आहेत. तर एलटी, विप्रो, टेक महिंद्रा, टायटन, जेएसडब्ल्यू स्टील हे शेअर्स घसरले आहेत.

निफ्टीवर बीपीसीएल, सिप्ला, आयशर मोटर्स, एम अँड एम, मारुती हे शेअर्स वधारले आहेत. तर LTIMINDTREE, ग्रासीम, एलटी, विप्रो, टायटन हे शेअर्स घसरले आहेत. (Stock Market Opening Bell)
आरबीआयने पेटीएम पेमेंट्स बँकेला त्यांच्या सर्व सेवांमध्ये नवीन ठेवी आणि क्रेडिट व्यवहारांपासून प्रतिबंधित केल्यानंतर फिनटेक फर्म पेटीएमचे शेअर्स २० टक्क्यांच्या लोअर सर्किटसह खुले झाले आहेत.
मोदी सरकारचा अंतरिम अर्थंसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज (१ फेब्रुवारी) लोकसभेत मांडतील. येत्या काही आठवड्यात होणारी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात सवलत तसेच, महिला, शेतकरी यासारख्या घटकासाठी सवलत योजना जाहीर होऊ शकतात, असे संकेत सरकारच्या वर्तुळातून मिळत आहेत.
 हे ही वाचा :

अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज अंतरिम अर्थंसंकल्प सादर करणार
अंतरिम अर्थसंकल्प विकसित भारताची हमी..? जाणून घ्या याविषयी अधिक

 
Latest Marathi News बजेटपूर्वी गुंतवणूकदार सावध, सेन्सेक्स, निफ्टी सपाट Brought to You By : Bharat Live News Media.