अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज अंतरिम अर्थंसंकल्प सादर करणार
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : आज म्हणजेच 1 फेब्रुवारी रोजी मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील शेवटचा अर्थसंकल्प (अर्थसंकल्प 2024) सादर होणार आहे. मोदी सरकारचा हा अंतरिम अर्थंसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामन लोकसभेत मांडतील. येत्या काही आठवड्यात होणारी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात सवलत तसेच, महिला, शेतकरी यासारख्या घटकासाठी सवलत योजना जाहीर होऊ शकतात, असे संकेत सरकारच्या वर्तुळातून मिळत आहेत. (Budget 2024 Updates Live)
निवडणूक वर्षात पूर्ण अर्थसंकल्पाऐवजी अंतरिम अर्थसंकल्प मांडला जातो. तसेच अंतरिम अर्थसंकल्पात धोरणात्मक घोषणा टाळल्या जातात. अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसद भवनात पोहोचल्या आहेत. मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मचा शेवटचा अर्थसंकल्प त्या आता लवकरच सादर करणार आहेत.
#WATCH | Union Finance Minister Nirmala Sitharaman will present the interim budget today pic.twitter.com/irGtbAcPbP
— ANI (@ANI) February 1, 2024
The post अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज अंतरिम अर्थंसंकल्प सादर करणार appeared first on Bharat Live News Media.