अंतरिम अर्थसंकल्प आज सादर होणार

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : मोदी सरकारचा अंतरिम अर्थंसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामन उद्या (१ फेब्रुवारी) लोकसभेत मांडतील. येत्या काही आठवड्यात होणारी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात सवलत तसेच, महिला, शेतकरी यासारख्या घटकासाठी सवलत योजना जाहीर होऊ शकतात, असे संकेत सरकारच्या वर्तुळातून मिळत आहेत. लोकसभेमध्ये उद्या सकाळी अकराच्या सुमारास अर्थमंत्री निर्मला सीतारामन अंतरिम अर्थसंकल्प मांडतील. … The post अंतरिम अर्थसंकल्प आज सादर होणार appeared first on पुढारी.

अंतरिम अर्थसंकल्प आज सादर होणार

नवी दिल्ली, Bharat Live News Media वृत्तसेवा : मोदी सरकारचा अंतरिम अर्थंसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामन उद्या (१ फेब्रुवारी) लोकसभेत मांडतील. येत्या काही आठवड्यात होणारी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात सवलत तसेच, महिला, शेतकरी यासारख्या घटकासाठी सवलत योजना जाहीर होऊ शकतात, असे संकेत सरकारच्या वर्तुळातून मिळत आहेत.
लोकसभेमध्ये उद्या सकाळी अकराच्या सुमारास अर्थमंत्री निर्मला सीतारामन अंतरिम अर्थसंकल्प मांडतील. निवडणूक वर्षात पूर्ण अर्थसंकल्पाऐवजी अंतरिम अर्थसंकल्प मांडला जातो. तसेच अंतरिम अर्थसंकल्पात धोरणात्मक घोषणा टाळल्या जातात. त्यापार्श्वभूमीवर अर्थमंत्री सितारामन यांनी अलिकडेच एका कार्यक्रमात बोलताना अंतरिम अर्थसंकल्पामध्ये मोठ्या घोषणा नसतील असे जाहीरपणे म्हटले होते. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही आज याच आशयाचे संकेत दिले. मात्र, विकसीत भारत साकारण्यासाठी या तरुण, गरीब, महिला, आणि शेतकरी या चार घटकांचा विकास आवश्यक असल्याचे सरकारतर्फे सातत्याने सांगितले जात आहे. त्यापार्श्वभूमीवर अंतरिम अर्थसंकल्पातून या चारही घटकांना दिलासा देणारी घोषणा होऊ शकते.
कृषी कर्जासाठीची आर्थिक तरतूद अंतरिम अंर्थसंकल्पामध्ये वाढू शकते. तर प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या अर्थसहाय्याची रक्कम ६००० रुपयांवरून ८००० रुपयांपर्यंत वाढ केली जाण्याची शक्यता आहे. यासोबतच, प्रधानमंत्री आवास योजनेसाठी दिला जाणारा निधी वाढविला जाईल अशी अपेक्षाही व्यक्त होत आहे. मध्यमवर्गीयांसाठी प्राप्तिकरातील सवलतींसाठीच्या विद्यमान रचनेमध्येही बदल अपेक्षित आहे. सद्यस्थितीत प्राप्तिकरातील सवलतीसाठी जुन्या रचनेतील उत्पन्न मर्यादा अडीच लाखावरून तीन लाख रुपये केली जाऊ शकते, असे बोलले जात आहे.
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत ८१ कोटी लोकांना मोफत अन्नधान्य पुरवण्याच्या योजना आगामी पाच वर्षे वाढविण्याची घोषणा आधीच केली आहे. तर खतांवरील अंशदानही वाढविले असल्याने सरकारवर आर्थिक भार वाढला आहे. त्यामुळे उत्पन्नाचे मार्ग शोधण्याची कसरत अर्थमंत्र्यांद्वारे होऊ शकते.  विकासदराची गती कायम राखणे, आखाती देशांमधील तणावग्रस्त परिस्थितीमुळे पुरवठा साखळीवर होणारा परिणाम पर्यायाने अर्थव्यवस्थेला त्याचा बसणारा संभाव्य फटका लक्षात घेऊन त्यासाठीच्या उपाययोजना करणे, वित्तीय तूट नियंत्रणात राखणे, भांडवली खर्चात वाढ करणे, निर्गुंतवणुकीतून निधी उभा करणे यासारख्या आव्हानांचा, महागाई नियंत्रणात राखणे यासारख्या आव्हानांचा विचार अंतरिम अर्थसंकल्पामध्ये केला जाऊ शकतो.
दरम्यान, आगामी अर्थसंकल्पाबाबत पंतप्रधान मोदींनी आज सांगितले, की सामान्यत: जेव्हा निवडणुकीची वेळ जवळ असते तेव्हा पूर्ण अर्थसंकल्प सादर केला जात नाही, आम्हीही त्याच परंपरेचे पालन करू आणि नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर पूर्ण अर्थसंकल्प मांडू. अर्थमंत्री निर्मला सीतारामन काही मार्गदर्शक मुद्द्यांसह आपला अंतरिम अर्थसंकल्प उद्या सादर करतील, असे पंतप्रधान मोदींनी म्हटले,
Latest Marathi News अंतरिम अर्थसंकल्प आज सादर होणार Brought to You By : Bharat Live News Media.