रविंद्र कुमार सिंगल नागपुरचे नवे पोलिस आयुक्त, अमितेेशकुमार यांना पुणेची जबाबदारी
नागपूर; Bharat Live News Media वृत्तसेवा : आगामी निवडणूक तोंडावर असताना पोलीस दलात मोठ्या प्रमाणात फेरबदल सुरू आहेत. आज महाराष्ट्र कॅडरचे आयपीएस डॉ. रविंद्र कुमार सिंगल यांची नागपुरचे नवे पोलिस आयुक्त म्हणून वर्णी लागली आहे. नागपुरचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची पुण्याचे पोलिस आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे.
रविंद्र कुमार सिंघल १९९६ मध्ये भारतीय पोलिस सेवेत रुजू झाले. १९९८ मध्ये त्यांना एएसपी सांगली शहर विभागात संधी मिळाली. १९९९ मध्ये त्यांची अमरावती शहर डीसीपी म्हणून नियुक्ती झाली. अमरावती येथे तीन वर्षांच्या सेवेनंतर ते नाशिक जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून रुजू झाले. २००३ साली त्र्यंबकेश्वर येथील कुंभमेळ्याचे संपूर्ण पोलीस व्यवस्थापन त्यांच्या टीमसह सांभाळले. २००७ ते २००९ या काळात त्यांनी “गुरु ता गद्दी तेर शताब्दी सेलिब्रेशन’ या मोठ्या कार्यक्रमाचे व्यवस्थापन केले. यासाठी देश-विदेशातून प्रचंड जनसमुदाय नांदेड जिल्ह्यात एकवटला होता.
डॉ. रविंद्र सिंघल यांनी एक वेबसाइटही तयार केली आहे. यावर त्यांनी त्यांच्या जीवनाशी निगडित काही प्रसंग आणि विचार मांडले आहेत.दरम्यान, नागपूर विभागाचा विचार करता गडचिरोली परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक संदीप पाटील यांची पदोन्नतीने नक्षल विरोधी अभियानाचे विशेष पोलिस महानिरीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे. पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांची गडचिरोली परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक म्हणून बदली झाली आहे. नागपुरचे पोलिस आयुक्त मुमक्का सुदर्शन यांची चंद्रपुरचे पोलिस अधीक्षक म्हणून बदली झाली आहे.
Latest Marathi News रविंद्र कुमार सिंगल नागपुरचे नवे पोलिस आयुक्त, अमितेेशकुमार यांना पुणेची जबाबदारी Brought to You By : Bharat Live News Media.