मराठा समाजाला टिकणारे आरक्षण मिळेल : संजय बनसोडे
पूर्णा, Bharat Live News Media वृत्तसेवा: फेब्रुवारी महिन्यात विशेष अधिवेशन बोलावून इतर समाजाच्या आरक्षणाला कुठलाही धक्का न लावता मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देण्यात येईल, अशी माहिती राज्याचे क्रीडा युवक कल्याण व बंदरे मंत्री तथा परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री संजय बनसोडे यांनी दिली. Sanjay Bansode
पूर्णा येथील २१ व्या बौध्द धम्म परिषद व स्मृतिशेष भदन्त उपाली थेरो यांचा ४१ वा स्मृतिदिन कार्यक्रम बुध्द विहाराच्या प्रांगणात आज (दि. ३१) आयोजित केला होता. यावेळी ते बोलत होते.Sanjay Bansode
ते पुढे म्हणाले की, मुंबई येथील ईदू मिलच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा डिसेंबर २०२४ पर्यंत उभारण्यात येणार आहे. बौध्द धम्म समाजाच्या विकासाठी भरीव निधी दिला आहे. गंगाखेडचे आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी देखील भरीव निधी आणून गंगाखेड मतदारसंघात विकास कामाचा सपाटा लावला आहे. पूर्णेकरांनी भव्य दिव्य बौध्द धम्म परिषदेचे आयोजन करुन समाजाला चांगले संस्कार आणि दिशा देण्याचे केलेले कार्य उल्लेखनीय आहे.
पूर्णा येथील बुध्द विहाराचे भदन्त उपाली महाथेरो, जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, राजेश विटेकर यांनी मनोगत व्यक्त केले. नगरसेवक दादाराव पंडित यांनी सूत्रसंचलन केले. कोनशिला फलकाचे पालकमंत्री संजय बनसोडे व आमदार डॉ रत्नाकर गुट्टे यांनी अनावरण केले. समाज कल्याण आयुक्त गिता गुट्टे, पोलीस अधीक्षक रागसुधा. आर आदी उपस्थित होते.
हेही वाचा
परभणी : पूर्णा तालुक्यात मोडी लिपीतील केवळ ८३ कुणबी नोंदी
परभणी: खोटे जात वैधता प्रमाणपत्र: जिंतूरमध्ये गोर सेनेचा रास्ता रोको
परभणी: जिंतूर तहसिल कार्यालयापुढे तहसीलदारांच्या गाडीला आग
Latest Marathi News मराठा समाजाला टिकणारे आरक्षण मिळेल : संजय बनसोडे Brought to You By : Bharat Live News Media.