आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तकांचे विविध मागण्यांसाठी थाळीनाद आंदोलन

जळगाव ; पुढारी वृत्तसेवा- आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर (दि. ३१) थाळीनाद आंदोलन करण्यात आले. आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तकांच्या गेली अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या मागण्या सोडविण्यासाठी ऑक्टोबर २०२३ मध्ये बेमुदत संप पुकारला होता. परिणामी ७ हजार रूपये तसेच गटप्रवर्तकांच्या मानधनात 10 हजार रूपये वाढ करण्याची घोषणा सार्वजनिक आरोग्य मंत्री … The post आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तकांचे विविध मागण्यांसाठी थाळीनाद आंदोलन appeared first on पुढारी.

आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तकांचे विविध मागण्यांसाठी थाळीनाद आंदोलन

जळगाव ; Bharat Live News Media वृत्तसेवा- आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर (दि. ३१) थाळीनाद आंदोलन करण्यात आले.
आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तकांच्या गेली अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या मागण्या सोडविण्यासाठी ऑक्टोबर २०२३ मध्ये बेमुदत संप पुकारला होता. परिणामी ७ हजार रूपये तसेच गटप्रवर्तकांच्या मानधनात 10 हजार रूपये वाढ करण्याची घोषणा सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी केली होती. परंतू त्या घोषणेनुसार अद्यापपावेतो त्याचा शासकीय आदेश काढलेला नाही, म्हणून राज्यातील आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांमध्ये प्रचंड नाराजी पसरलेली आहे. घोषणेनुसार मानधनाची रक्कम वाढवावी, ऑनलाईन कामाची सक्ती थांबवावी आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांचा सेवानिवृत्तीचे वय निश्चित करून सेवानिवृत्ती वेतन दयावे, त्यांना प्रधानमंत्री जीवनज्योती विमा लागू करण्यात यावा, दरमहा भरीव स्वरूपाचे निश्चित मानधन लागू करावे, अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या धर्तीवरी पाच हजार भाउबीज भेट दयावी, काम सोईचे होण्यासाठी मोबाईल व लॅपटॉप दयावे, राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे खासगीकरण होऊ नये, आशा स्वयंसेविकांना दरवर्षी गणवेशासाठी दोन हजार रूपये देण्यात यावे, आशा स्वयंसेविकांना प्रत्येक बाळंतपणासाठी मोबदला दयावा, आशा स्वयंसेविकांना आरोग्य कीट देण्यात यावे, कामसाठी लागणारी स्टेशनरी व साहित्य देण्यात यावे, मोबदला अदा करण्यासाठी वेतन स्लिप देण्यात यावे,
आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना शासकीय नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्यात यावे अशा विविध मागण्यांसाठी आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांनी थाळीनाद आंदोलन केले.
हेही वाचा :

सिंधुदुर्ग: आंबोलीतील जमिनींवरील परप्रातीयांचे अतिक्रमण ग्रामस्थांनी हटविले
अनिल बाबर यांचे अधुरे स्वप्न शंभर टक्के पूर्ण करणार : देवेंद्र फडणवीस
सिंधुदुर्ग: आंबोलीतील जमिनींवरील परप्रातीयांचे अतिक्रमण ग्रामस्थांनी हटविले

Latest Marathi News आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तकांचे विविध मागण्यांसाठी थाळीनाद आंदोलन Brought to You By : Bharat Live News Media.