Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : ‘यशोदा’, ‘पुष्पा १’ आणि ‘द फॅमिली मॅन’ सारख्या दमदार चित्रपटात दिसलेली बॉलिवूड अभिनेत्री सामंथा रुथ प्रभू ( Samantha Ruth Prabhu ) पुन्हा एकदा तिच्या आगामी प्रोजेक्टसाठी सज्ज झाली आहे. सामंथा आगामी ‘सिटाडेल’ चित्रपटात अभिनेता वरुण धवनसोबत स्क्रिन शेअर करणार असल्याची माहिती समोर येत आहे. एकिकडे सामंथाचा तिच्या प्रोजेक्टमधील कलाकारांसोबतचा फोटो व्हायरल झाला आहे. तर दुसरीकडे नुकतेच सामंथा ऑल-ब्लॅक स्पोर्टी लूकमध्ये विमान तळावर स्पॉट झाली आहे.
संबंधित बातम्या
Isha Malviya : ‘बिग बॉसच्या बाथरूममध्ये मायक्रोफोन होते’, ईशा मालवीयचा…
Actor Dhanush : तिरुपतीमध्ये धनुषच्या ‘डीएनएस’ चं शूटिंग थांबवलं; पोलिसांनी…
Rakul-Jackky Wedding : आता भारतातच डेस्टिनेशन वेडिंग; रकुल-जॅकीने परदेशातील लग्न केलं रद्द
नुकतेच सामंथा रुथ प्रभूने ( Samantha Ruth Prabhu ) तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये सामंथा तिच्या आगामी चित्रपटाच्या संपूर्ण टीमसोबत दिसत आहे. याशिवाय फोटोंत तिच्यासोबत बॉलिवूड अभिनेता वरुण धवनही दिसत आहे. शेअर झालेल्या फोटोत चित्रपटाची संपूर्ण टीम समोर असलेल्या लॅपटॉपवर काहीतरी पाहताना आणि आपापसात चर्चा करताना दिसत आहेत. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने ‘शेवटी आम्हाला काहीतरी पाहायला मिळाले… आणि आम्ही असे आहोत’. असे लिहिले आहे.
हा फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी अनेक वेगवेगळे तर्क- वितर्क लावत कॉमेन्टसचा पाऊस पाडलाय. नेटकऱ्यांनी सामंथा आणि वरुण धवन आगामी ‘सिटाडेल’ चित्रपटात एकत्रित दिसणार असून चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र, खरोखरंच दोन्ही स्टार्स ‘सिटाडेल’ मध्ये दिसणार आहेत की नाही? यांची अधिकृत्त माहिती समोर आलेली नाही.
चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान सामंथा मुंबईतील विमानतळावर स्पॉट झाली आहे. यावेळी तिच्या हातात चहा किंवा कॉफीचा मग दिसत आहे. ऑल-ब्लॅक स्पोर्टी लुकमध्ये ती सामंथा खूपच ग्लॅमरस दिसत आहे. हा व्हिडिओ सामंथाने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलाय. सुरूवातीला सामंथा बाहेर येताना आणि नंतर ती तिच्या कारमध्ये बसतानाही दिसत आहे.
‘सिटाडेल’ चे दिग्दर्शन ‘द फॅमिली मॅन’ फेम निर्माता जोडी राज निदिमोरू आणि कृष्णा डीके यांनी केलं आहे. सामंथा आणि वरुण दोघांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, सामंथाने काही काळ फिल्मी जगतातून ब्रेक घेतला होता. तर वरुण धवन ‘भेडिया-२’ चित्रपटात दिसला होता.
View this post on Instagram
A post shared by Sam❤️ (@samantharuthprabhuoffi_fan)
View this post on Instagram
A post shared by Sam❤️ (@samantharuthprabhuoffi_fan)
Latest Marathi News सामंथा-वरुण धवन यांचा येतोय ‘सिटाडेल’?; ऑल-ब्लॅक स्पोर्टी लूक Brought to You By : Bharat Live News Media.