पंतप्रधान मोदी यांना छत्रपती घराण्याचा पहिला शिव सन्मान पुरस्कार
सातारा, Bharat Live News Media वृत्तसेवा : श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घराण्यातून देण्यात येणारा पहिला मानाचा “शिवसन्मान पुरस्कार” भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घोषित झाला आहे. साताऱ्यातील सैनिक स्कूलच्या भव्य मैदानावर १९ फेब्रुवारी २०२४ रोजी शिवजयंती दिनी गौरवपूर्ण प्रदान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले निमंत्रक आहेत. यंदाच्या वर्षापासून हा पुरस्कार देण्यात येणार आहे. Shiv Samman Award
या नियोजित कार्यक्रमाच्या जागेची आज (दि. ३१) जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आणि पोलिसप्रमुख समीर शेख यांनी पाहणी केली. यावेळी सैनिक स्कूलचे प्राचार्य, अधीक्षक, नगरपरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत बापट, विविध विभागांचे विभागप्रमुख, सुनील काटकर, काका धुमाळ, पंकज चव्हाण, मनोज शेंडे, विनीत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. Shiv Samman Award
राजघराणे व तमाम शिवभक्तांच्या वतीने देण्यात येणार मानाचा शिवसन्मान पुरस्कार पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांना घोषित झाला आहे साताऱ्यातील सैनिक स्कूल मैदानावर दि. 19 फेब्रुवारी शिवजयंतीदिनी गौरवपूर्ण प्रदान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या जागेची आज पाहणी केली.@narendramodi pic.twitter.com/n4dDPHToNZ
— Chhatrapati Udayanraje Bhonsle (@Chh_Udayanraje) January 31, 2024
हेही वाचा
सातारा : मांढरगड दुमदुमणार; यात्रेचा आज मुख्य दिवस
सातारा : जिल्ह्यात मराठा समाजाचे सर्वेक्षण सुरू
सातारा : संगममाहुलीचे पेशवेकालीन श्रीराम मंदिर
Latest Marathi News पंतप्रधान मोदी यांना छत्रपती घराण्याचा पहिला शिव सन्मान पुरस्कार Brought to You By : Bharat Live News Media.