Crime news : वकील दाम्पत्य हत्येचा तपास ‘सीआयडी’कडे

राहुरी : पुढारी वृत्तसेवा :  राहुरी तालुक्यातील मानोरी येथील अ‍ॅड. आढाव दाम्पत्याच्या हत्येचा तपास अखेर सीआयडीकडे सोपविण्यात आला आहे. मुंबई येथील विशेष पोलीस महानिरीक्षक सुहास वारके यांनी तसा आदेश निर्गमित केला आहे. अ‍ॅड राजाराम आढाव व त्यांच्या पत्नी अ‍ॅड मनीषा आढाव यांची हत्या केल्यानंतर त्यांचे मृतदेह दगड बांधून विहिरीत टाकले होते. पोलिसांनी तत्काळ तपासचक्रे फिरवत … The post Crime news : वकील दाम्पत्य हत्येचा तपास ‘सीआयडी’कडे appeared first on पुढारी.

Crime news : वकील दाम्पत्य हत्येचा तपास ‘सीआयडी’कडे

राहुरी : Bharat Live News Media वृत्तसेवा :  राहुरी तालुक्यातील मानोरी येथील अ‍ॅड. आढाव दाम्पत्याच्या हत्येचा तपास अखेर सीआयडीकडे सोपविण्यात आला आहे. मुंबई येथील विशेष पोलीस महानिरीक्षक सुहास वारके यांनी तसा आदेश निर्गमित केला आहे. अ‍ॅड राजाराम आढाव व त्यांच्या पत्नी अ‍ॅड मनीषा आढाव यांची हत्या केल्यानंतर त्यांचे मृतदेह दगड बांधून विहिरीत टाकले होते. पोलिसांनी तत्काळ तपासचक्रे फिरवत 5 आरोपीना तातडीने जेरबंद केले. 5 लाख रुपयांच्या खंडणीसाठी खून केल्याची कबुली आरोपींनी दिल्याची माहिती पोलिसांना माध्यमांना दिली. परंतू हत्येबाबत अनेक शंकाकुशंका व्यक्त होत आहेत. राजकीय, सामाजिक क्षेत्रासह राज्यातील वकील बार असोसिएशनने याबाबत आवाज उठवत घटनेबाबत दाखल गुन्हा व प्रत्यक्ष घटनेत विसंगती असल्याचा आरोप केला आहे.
त्यामुळे या प्रकरणाची सीआयडी किंवा एसआयटी मार्फत चौकशी व्हावी अशी मागणी पुढे आली होती. महाराष्ट्र व गोवा वकील बार असोसिएशनने आंदोलन हाती घेतले आहे. अखेरीस गृह विभागाने या प्रकरणाची दखल घेत या गुन्ह्याचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपविण्यात येत असल्याचा आदेश काढला आहे. दरम्यान राहुरी येथील न्यायालय आवारात वकिलांनी कामबंद ठेवत सुरू केलेल्या साखळी उपोषणस्थळी राज्यातील नामवंत कायदेतज्ज्ञ भेटी देत आहेत. भारतीय विधीज्ञ परिषदेचे सदस्य अ‍ॅड. जयंत जायभाय यांच्यासह महाराष्ट्र व गोवा वकील परिषदेचे उपाध्यक्ष अ‍ॅड. राजेंद्र उमाप, सदस्य अ‍ॅड. अहमदखान पठाण, नगर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. भुषण बर्‍हाटे, नाशिक जिल्हा वकील संघाचे अ‍ॅड. शिवाजी शेळके, अकोला बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. वसंतराव मानकर, अ‍ॅड. रमेश जगताप, अ‍ॅड. गोरक्षनाथ तांदळे, राहाता बार असोसिएशनेच अ‍ॅड. दिगंबर धनवटे, अ‍ॅड. विक्रम सगळगिळे, अ‍ॅड. अजित काळे, अ‍ॅड. रोहित बनसोडे, अ‍ॅड. लक्ष्मीकांत पटारे, छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयाचे वकील संघाचे जिल्हा अध्यक्ष अ‍ॅड. नरसिंह जाधव यांनी राहुरी बार असोसिएशनच्या साखळी उपोषणाला भेट देत अ‍ॅड. आढाव दाम्पत्य हत्या प्रकरणासह वकील संरक्षण कायद्याबाबत संवाद साधला.
5 फेब्रुवारीपर्यंत सद्यस्थितीचा अहवाल
कायदा व सुव्यवस्थेचे पोलिस महासंचालक सुहास वारके यांनी तपास वर्ग झाल्याचे आदेश काढले. केस डायरीसह गुन्ह्याची कागदपत्रे प्राप्त करून घेत शीघ्रगतीने तपास करावा. तसेच 5 फेब्रुवारीपर्यंत सद्यस्थितीचा अहवाल सादर करण्याचे आदेशात म्हटले आहे. नगर पोलिस अधीक्षकांनी गुन्ह्याची केस डायरीसह मुळ कागदपत्रे त्वरीत सीआयडी अप्पर पोलिस महासंचालकांकडे सोपविण्याचे आदेशात नमूद के ले आहे.
Latest Marathi News Crime news : वकील दाम्पत्य हत्येचा तपास ‘सीआयडी’कडे Brought to You By : Bharat Live News Media.