ठाणे: शहापुरात ३५० विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा; १० विद्यार्थी गंभीर

ठाणे : पुढारी वृत्तसेवा : शहापुरातील भातसई आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना अन्नातून आज (दि. ३१) विषबाधा झाली. सुमारे ३५० विद्यार्थ्यांना विषबाधा झाली असून ५५ विद्यार्थ्यांवर शहापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यातील १० मुलांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. Thane News शहापूर तालुक्यातील वासिंद परिसरातील भतसई येथील संत गाडगे महाराज प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळेतील … The post ठाणे: शहापुरात ३५० विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा; १० विद्यार्थी गंभीर appeared first on पुढारी.

ठाणे: शहापुरात ३५० विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा; १० विद्यार्थी गंभीर

ठाणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : शहापुरातील भातसई आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना अन्नातून आज (दि. ३१) विषबाधा झाली. सुमारे ३५० विद्यार्थ्यांना विषबाधा झाली असून ५५ विद्यार्थ्यांवर शहापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यातील १० मुलांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. Thane News
शहापूर तालुक्यातील वासिंद परिसरातील भतसई येथील संत गाडगे महाराज प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळेतील ३५० विद्यार्थ्यांना आज दुपारच्या सत्रात डाळ, भात, भाजी, गुलाबजाम असे जेवण देण्यात आले. जेवण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना उलटी, मळमळ, अस्वस्थ वाटू लागले. अनेक विद्यार्थी चक्कर येऊन पडले. व्यवस्थापनाने शाळेतील शिक्षक आणि स्थानिकांच्या मदतीने विद्यार्थ्यांना खासगी वाहनाने तत्काळ शहापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. ६० विद्यार्थ्यांवर उपचार सुरू असून त्यापैकी १० विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर आहे. Thane News
हेही वाचा 

ठाणे : बदलापुरातील प्लॅटफॉर्म क्रमांक १ होणार कायमस्‍वरूपी बंद; प्रवाशांना बसणार फटका
ठाणे : मुरबाड येथील म्हसा यात्रेत ४ लाख भाविकांनी घेतले श्री खांबलिंगेश्वराचे दर्शन
ठाणे : मिरारोडमध्ये ‘बुलडोझर कारवाई’; गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश

Latest Marathi News ठाणे: शहापुरात ३५० विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा; १० विद्यार्थी गंभीर Brought to You By : Bharat Live News Media.