अनिल बाबर यांचे अधुरे स्वप्न पूर्ण करणार : देवेंद्र फडणवीस

सांगली: पुढारी वृत्तसेवा : टेंभू योजनेचा सहावा टप्पा हे दिवंगत आमदार अनिल बाबर यांचे स्वप्न होते. ते आम्ही शंभर टक्के पूर्ण करू, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (दि.३१) येथे दिली. अनिल भाऊ हे जनसामान्यांचे नेते होते. सरपंच जिल्हा परिषद सदस्य ते चार वेळा आमदार झाले. या भागाची त्यांनी प्रचंड सेवा केली. दुष्काळी भागात … The post अनिल बाबर यांचे अधुरे स्वप्न पूर्ण करणार : देवेंद्र फडणवीस appeared first on पुढारी.

अनिल बाबर यांचे अधुरे स्वप्न पूर्ण करणार : देवेंद्र फडणवीस

सांगली: Bharat Live News Media वृत्तसेवा : टेंभू योजनेचा सहावा टप्पा हे दिवंगत आमदार अनिल बाबर यांचे स्वप्न होते. ते आम्ही शंभर टक्के पूर्ण करू, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (दि.३१) येथे दिली.
अनिल भाऊ हे जनसामान्यांचे नेते होते. सरपंच जिल्हा परिषद सदस्य ते चार वेळा आमदार झाले. या भागाची त्यांनी प्रचंड सेवा केली. दुष्काळी भागात पाणी पोचले पाहिजे, सिंचन सुविधा निर्माण झाल्या पाहिजेत, अशी त्यांची नेहमीच तळमळ असे. त्यांना मोठे पद मिळण्याची अपेक्षा होती. त्यांच्या अचानक निधनाने शोककळा पसरली आहे. मध्यंतरी टेंभू योजनेच्या प्रशासकीय मान्यते संदर्भात ते माझ्या सतत संपर्कात होते. प्रशासकीय मान्यता मिळेपर्यंत त्यांनी पाठपुरावा सोडला नाही. टेंभू योजनेचा सहावा टप्पा पूर्ण करणे हे त्यांचे स्वप्न होते. ते आम्ही शंभर टक्के पूर्ण करणार आहोत, असे उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
हेही वाचा 

सांगली : सरपंच ते आमदार अनिल बाबर यांचा राजकीय प्रवास
आमदार अनिल बाबर यांच्या निधनानंतर राज्य मंत्रिमंडळाची बैठक रद्द; मुख्यमंत्री सांगलीला रवाना
Shiv Sena MLA Anil Babar | शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांचे निधन, वयाच्या ७४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Latest Marathi News अनिल बाबर यांचे अधुरे स्वप्न पूर्ण करणार : देवेंद्र फडणवीस Brought to You By : Bharat Live News Media.