तिरुपतीमध्ये धनुषच्या ‘डीएनएस’ चं शूटिंग थांबवलं; पोलिसांनी…

पुढारी ऑनलाईन डेस्क : साऊथ अभिनेता धनुष ( Actor Dhanush ) याचा ‘कॅप्टन मिलर’ या चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या धमाकेदार चित्रपटानंतर धनुष आणखी एका नव्या चित्रपटासाठी सज्ज झालाय. धनुषने दिग्दर्शक शेखर कममुलासोबत ‘डीएनएस’ ( DNS ) या चित्रपटात काम करण्यास सुरुवात केली. या चित्रपटाचा पहिल्या भागाचे शुटिंग तिरुपतीमध्ये होणार होते. मात्र, परवानगी … The post तिरुपतीमध्ये धनुषच्या ‘डीएनएस’ चं शूटिंग थांबवलं; पोलिसांनी… appeared first on पुढारी.
तिरुपतीमध्ये धनुषच्या ‘डीएनएस’ चं शूटिंग थांबवलं; पोलिसांनी…

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : साऊथ अभिनेता धनुष ( Actor Dhanush ) याचा ‘कॅप्टन मिलर’ या चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या धमाकेदार चित्रपटानंतर धनुष आणखी एका नव्या चित्रपटासाठी सज्ज झालाय. धनुषने दिग्दर्शक शेखर कममुलासोबत ‘डीएनएस’ ( DNS ) या चित्रपटात काम करण्यास सुरुवात केली. या चित्रपटाचा पहिल्या भागाचे शुटिंग तिरुपतीमध्ये होणार होते. मात्र, परवानगी न मिळाल्याने चित्रपटाचे शूटिंग थांबविले गेलं आहे.
संबंधित बातम्या 

‘येऊ कशी तशी मी नांदायला’ फेम शाल्व किंजवडेकरचे पुनरागमन
Agni Chopra : ’12वी फेल’ फेम दिग्दर्शकाच्या मुलाचा प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये विक्रम; ठरला पहिला भारतीय फलंदाज
Jacqueline Fernandez : ‘जॅकलिनने जाणुनबुजून सुकेश चंद्रशेखरच्या पैशांचा वापर केला’

रिपोर्टच्या माहितीनुसार, गेल्या काही आठवड्यांपूर्वी अभिनेता धनुषच्या ( Actor Dhanush ) आगामी ‘डीएनएस’ चित्रपटाचा मुहूर्त आणि पूजा करण्यात आली होती. त्यानंतर पहिलं शूटिंग तिरुपती बालाजी मंदिराच्या परिसरात करण्यात येणार होतं. मात्र, चित्रपटाच्या क्रूमेंबरविरोधात तक्रार दाखल झाल्याने चित्रपटाचे शूटिंग थांबविण्यात आलं आहे.
‘डीएनएस’ चे शूटिंग तिरुपती पर्वताच्या पायथ्याशी होणार होतं. यामुळे येथील बस, इतर वाहने आणि कार इतरस्त्र अनेक मार्गाने वळविण्यात आल्या होत्या. त्यामुळे रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. दरम्यानच चित्रपटाच्या क्रू मेंबर्सनी मंदिरातील भक्तांना मंदिराबाहेर काढलं कारण, त्यांना गोविंदराजा स्वामी मंदिराबाहेर शूटिंग करायचे होते.
या सगळ्यामुळे चित्रपटाच्या क्रूमेंबरविरोधात आणि त्यांच्या कृत्याबद्दल अनेक तक्रारी करण्यात आल्या. यानंतर तिरुपती पोलिसांनी डीएनएस टीमला तिथे शूटिंग करण्याची परवानगी नाकारली. नंतर आता चित्रपटाचे शूटिंग थांबविले गेले.
‘डीएनएस’ या चित्रपटाशिवाय धनुष आणखी एका चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचे नाव ‘डी 50’ असे आहे. धनुषने या चित्रपटात अभिनय आणि दिग्दर्शनही केलं आहे. तसेच धनुषसोबत ‘डीएनएस’ चित्रपटात साऊथ अभिनेता रश्मिका मंदान्ना आणि नागार्जुन मुख्य भूमिकेत आहेत. धनुषच्या चाहत्यांना मात्र, त्याच्या चित्रपटासाठी उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

 

View this post on Instagram

 
A post shared by Dhanush (@dhanushkraja)

 

View this post on Instagram

 
A post shared by Dhanush (@dhanushkraja)

Latest Marathi News तिरुपतीमध्ये धनुषच्या ‘डीएनएस’ चं शूटिंग थांबवलं; पोलिसांनी… Brought to You By : Bharat Live News Media.