Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची सक्तवसुली संचालनालयाचे ( ‘ईडी’ ) अधिकारी जमीन घोटाळा प्रकरणी चौकशी करत आहेत. दरम्यान, आज (दि.३१) सोरेन यांनी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यांतर्गत कारवाईची मागणी करत ‘ईडी’ अधिका-यांविरुद्ध पोलिस तक्रार दाखल केली आहे. ( Hemant Soren files police complaint against ED officials)
जमीन घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ‘ईडी’ अधिकाऱ्यांनी बुधवारी सोरेन यांची रांची येथील त्यांच्या निवासस्थानी चौकशी केली.१० दिवसांत हेमंत सोरेन यांची अंमलबजावणी संचालनालयाकडून चौकशी करण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी २० जानेवारी रोजी या प्रकरणासंदर्भात त्यांची चौकशी करण्यात आली होती. ( Hemant Soren files police complaint against ED officials)
कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी रांचीमध्ये प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. अधिकाऱ्यांनी चौकशीदरम्यान अतिरिक्त सुरक्षेची मागणी केली होती.’ईडी’ अधिकाऱ्यांनी सोमवारी दिल्लीतील त्याच्या घरी शोध मोहिमेदरम्यान 36 लाख रुपये, एक एसयूव्ही आणि कागदपत्रे जप्त केली होती. आता सोरेन यांनी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यांतर्गत कारवाईची मागणी करत ‘ईडी’ अधिका-यांविरुद्ध पोलिस तक्रार दाखल केली आहे. निवासस्थानाची झडती घेतल्याप्रकरणी ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.
Hemant Soren lodges FIR against ED sleuths at SC/ST police station in Ranchi over agency’s searches at Delhi house: Official
— Press Trust of India (@PTI_News) January 31, 2024
Latest Marathi News झारखंडच्या मुख्यमंत्र्यांची ‘ईडी’ अधिकाऱ्यांविरोधात पोलिसांत तक्रार Brought to You By : Bharat Live News Media.