Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भारत जोडो न्याय यात्रा आज पश्चिम बंगालमध्ये दाखल झाली. मालदा जिल्ह्यात राहुल गांधी यांच्या कारवर दगडफेकीच घटना घडली. बिहारमधून यात्रा पश्चिम बंगालमध्ये परत येत असताना मालदाच्या हरिश्चंद्रपूर भागात हा हल्ला झाला, असा दावा काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी केला आहे. ( Rahul Gandhi’s car ‘pelted with stones’ during Congress yatra in Bengal: Adhir Ranjan Chowdhury )
निष्काळजीपणामुळे घटना घडली : अधीर रंजन चौधरी
अधीर रंजन चौधरी म्हणाले की, बुधवारी पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यात ‘भारत जोडो न्याय यात्रे’चा एक भाग म्हणून राहुल गांधी प्रवास करत असलेल्या कारवर अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केली. या घटनेत वाहनाच्या मागील खिडकीच्या काचा फुटल्या, राहुल गांधी यांना कोणतीही दुखापत झाली नाही. राहुल गांधी यांच्या कारवर मागून कोणीतरी दगडफेक केली असावी. पोलिस दुर्लक्ष करत आहेत. निष्काळजीपणामुळे ही घटना घडली, अशी कोणतीही मोठी घटना घडू शकते, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. Rahul Gandhi’s car ‘pelted with stones’ during Congress yatra in Bengal: Adhir Ranjan Chowdhury
राहुल गांधींच्या कार्यक्रमाला ममता सरकारने परवानगी नाकारली
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा आज पुन्हा बंगालमध्ये दाखल होणार आहे. या कालावधीत यात्रा मालदा आणि मुर्शिदाबाद मार्गे जाईल. मात्र, त्याआधी ममता सरकार यात्रेसाठी सहकार्य करत नसल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. ममता सरकारने राहुल गांधींच्या मालदा आणि मुर्शिदाबादच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारल्याचा दावा बंगाल काँग्रेसचे अध्यक्ष अधीर रंजन चौधरी यांनी केला आहे.
STORY | Rahul Gandhi’s car ‘pelted with stones’ during Congress yatra in Bengal: Adhir Ranjan Chowdhury
READ: https://t.co/1gEDXZJJPY
VIDEO: pic.twitter.com/Mi44AqNeBq
— Press Trust of India (@PTI_News) January 31, 2024
The post ‘राहुल गांधींच्या कारवर पश्चिम बंगालमध्ये दगडफेक’ appeared first on Bharat Live News Media.