मुलींचे ऋतुचक्राचे वयही झाले कमी, काय आहेत कारणे?

सातारा : पूर्वी मुलींचे वयात येण्याचे वय हे 13 ते 15 वर्षे होते. परंतु जीवनशैली, मर्यादित शारीरिक हालचाली व आहार-विहाराच्या बदलत्या सवयींमुळे अलीकडे मुलींचे ऋतुचक्र सुरु होण्याचे वय कमी होऊन ते 10 ते 13 वर्षांच्या दरम्यान झाले आहे. मुलींमधील हार्मोन बदलांमुळे कमी वयातच तारुण्याच्या समस्यांचेही प्रमाण वाढत आहे. बदलत्या जीवनैलीत राहणीमानाचा दर्जा सुधारला असला तरी … The post मुलींचे ऋतुचक्राचे वयही झाले कमी, काय आहेत कारणे? appeared first on पुढारी.

मुलींचे ऋतुचक्राचे वयही झाले कमी, काय आहेत कारणे?

मीना शिंदे

सातारा : पूर्वी मुलींचे वयात येण्याचे वय हे 13 ते 15 वर्षे होते. परंतु जीवनशैली, मर्यादित शारीरिक हालचाली व आहार-विहाराच्या बदलत्या सवयींमुळे अलीकडे मुलींचे ऋतुचक्र सुरु होण्याचे वय कमी होऊन ते 10 ते 13 वर्षांच्या दरम्यान झाले आहे. मुलींमधील हार्मोन बदलांमुळे कमी वयातच तारुण्याच्या समस्यांचेही प्रमाण वाढत आहे.
बदलत्या जीवनैलीत राहणीमानाचा दर्जा सुधारला असला तरी यामध्ये उपलब्ध सोयी सुविधांमुळे शारीरिक श्रम व पर्यायाने व्यायाम कमी झाला आहे. ताजा व सात्त्विक आहाराऐवजी फास्टफूडचा वापर वाढला आहे. त्याचे दुष्परिणाम आरोग्यावर होत आहेत. मुलींचे ऋतुचक्राचे वयही कमी झाले आहे. साधारणपणे 13 ते 15 वर्षात मुली वयात यायच्या. पण अलीकडे 10 व्या, 11 व्या वर्षीच मुलींचे ऋतुचक्र सुरु होते. हाडे व स्नायूंची वाढ, शरीराच्या आकारात, शरीर पुनरुत्पादनाच्या क्षमतेचा विकासही लवकर होत आहे. अकाली तारुण्यात येण्याचे प्रमाण वाढले आहे. मुलींमध्ये हार्मोन बदलामुळे कमी वयात तारुण्याच्या समस्यांचे प्रमाणही वाढले आहे.
मानसिक व शारीरिक बदलाची प्रक्रिया…
ऋतुचक्र सुरु झाल्यावरही मुलींची शारीरिक वाढ व मानसिक बदल होण्याची प्रक्रिया सुरुच असते. या दरम्यान होणारे शारीरिक बदल स्वीकारुन ते समजून घेण्याची मानसिक कुवत वाढावी, अशी अपेक्षा पालकांकडून केली जाते. त्यामुळे मुलींची मानसिक कुचंबणा होते. ऋतुचक्र लवकर आले म्हणून तिची मानसिक वाढही लवकर होईल हा समज दूर ठेवून त्यांना भावनिकदृष्ट्या समजून घेण्याची जास्त गरज असते.
अशी आहेत कारणे…
रासायनिक खतांवर पिकवलेल्या अन्नाचे तसेच फास्ट फूडचे सेवन केले जात असल्याने रासायनिक घटक शरीरात जात आहेत. व्यायामाचा अभाव व यांत्रिकीकरणामुळे दैनंदिनीतील कष्टाची कामे कमी झाली आहेत. धकाधकीच्या दिनचर्येमुळे व वाढते ताण-तणाव हे मुलींच्या लवकर वयात येण्याचे मुख्य कारण ठरत आहे. क्वचित प्रसंगी ही आनुवंशिकताही जबाबदार असल्याचे समोर आले आहे.

हल्ली सोशल माध्यमांचा वापर व त्यावरील उत्थान जाहिरातींमुळे मुलींना सर्वच गोष्टींची समज व संवेदना लवकर येत आहेत. त्यामुळे हार्मोनल बदलाची प्रक्रियाही कमी वयातच होत आहे. त्यातच मैदानी खेळ, कसरती कमी झाल्याने वजनही वाढत आहे. या सर्वांमुळे मुलींचे ऋतुचक्राचे वय अलीकडे आले आहे.
– डॉ. स्मिता कासार, स्त्रीरोग तज्ज्ञ

Latest Marathi News मुलींचे ऋतुचक्राचे वयही झाले कमी, काय आहेत कारणे? Brought to You By : Bharat Live News Media.