विराट कोहलीच्या भावाने दिले आईच्या तब्येतीचे अपडेट
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि स्टार फलंदाज विराट कोहली इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमधून बाहेर पडला आहे. कौटुंबिक कारणांमुळे त्याने संघात न येण्याचा निर्णय घेतला. यानंतर सोशल मीडियावर विविध प्रकारच्या अफवा पसरू लागल्या. कधी पत्नी अनुष्का शर्मा दुस-यांदा आई होणार असल्याचं बोललं जात होतं तर कधी कोहलीच्या आईची तब्येत बिघडल्याचं समोर आलं होतं. आता विराटचा मोठा भाऊ विकास याने सर्व काही स्पष्ट केले आहे. (Virat Kohli Mother Health)
संबंधित बातम्या :
‘विराट माझ्यावर थुंकला..’, द. आफ्रिकेच्या क्रिकेटरचा धक्कादायक आरोप (Video)
‘माझ्या खेळापेक्षा; मला बाई म्हणून पाहिले’, बुद्धीबळपटू दिव्या देशमुखची खंत
जडेजा, राहुल दुसऱ्या कसोटीतून बाहेर, सरफराज खानला संधी
विकास कोहलीने इन्स्टाग्रामवर आई सरोज कोहलीच्या प्रकृतीशी संबंधित अफवा फेटाळून लावल्या. त्याने चाहत्यांना योग्य माहितीशिवाय खोट्या बातम्या पसरवू नका, असे आवाहन केले. आईच्या आजारपणामुळे विराटने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांमधून विश्रांती मागितल्याच्या अफवा पसरल्या होत्या. (Virat Kohli Mother Health)
विकास कोहलीने काय लिहिले?
विकासने इंस्टाग्रामवर लिहिले की, “आमच्या आईच्या तब्येतीची ही खोटी बातमी सर्वत्र पसरलेली मी पाहिली आहे. मी स्पष्ट करतो की आमची आई पूर्णपणे तंदुरुस्त आहे. योग्य माहितीशिवाय अशा बातम्या पसरवू नयेत अशी मी सर्वांना आणि प्रसारमाध्यमांना विनंती करतो.
हेही वाचा :
BCCI चे सचिव जय शहा सलग तिसऱ्यांदा ACC च्या अध्यक्षपदी
’12वी फेल’ फेम दिग्दर्शकाच्या मुलाचा प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये विक्रम
स्मृती मानधनाचे वादळी शतक
दुसर्या कसोटीत इंग्लंडचा काय आहे गेम प्लॅन?
Latest Marathi News विराट कोहलीच्या भावाने दिले आईच्या तब्येतीचे अपडेट Brought to You By : Bharat Live News Media.