Market News : आंबट-गोड बोरे बाजारात आली
पुणे : गोड, आंबट चवीचे बोर म्हटल्यावर कुणाच्याही तोंडाला पाणी सुटेल. याच बोरांचा हंगाम सध्या सुरू झाला असून सोलापूर तसेच राजस्थान येथून बोरे बाजारात दाखल होऊ लागली आहेत. गुलटेकडी मार्केट यार्डातील घाऊक फळबाजारात बोरांच्या दहा किलोला 150 ते 900 रुपयांपर्यंतचा भाव मिळत आहे. किरकोळ बाजारात या बोरांची 50 ते 120 रुपये या दराने विक्री सुरू आहे. सोलापूर येथून चेकनट, उमराण व चमेली बोरांच्या 40 ते 45 किलोंच्या एक ते दोन डागांची दररोज आवक होऊ लागली आहे. याखेरीज, राजस्थान येथूनही चार ते सहा दिवसांआड एक ते दोन डाग बाजारात दाखल होत आहे.
बोरांसह फळबाजारात अन्य फळेही मोठ्या प्रमाणात दाखल होत आहे. मात्र, मागणीअभावी कलिंगड, खरबूज, पपई, लिंबू आणि पेरुच्या भावात दहा टक्क्यांनी घसरण झाली आहे. तर, सीताफळाचे भाव दहा टक्क्यांनी वधारले आहेत. चिक्कू, अननस, डाळींब, मोसंबी आणि संत्र्याचे भाव स्थिर असल्याचे व्यापारी वर्गाकडून सांगण्यात आले.
गुलटेकडी येथील मार्केटयार्डमध्ये रविवारी केरळ येथून अननस 5 ट्रक, मोसंबी 60 ते 70 टन, संत्रा 20 ते 25 टन, डाळिंब 20 ते 25 टन, पपई 1 ते 2 टेम्पो, लिंबांची सुमारे 1000 ते 1200 गोणी, कलिंगड 2 ते 3 टेम्पो, खरबूज 1 ते 2 टेम्पो, सीताफळ 20 ते 25 टन, चिक्कूची 1 हजार बॉक्स इतकी आवक झाली.
फळांचे भाव पुढीलप्रमाणे : लिंबे (प्रतिगोणी) : 400-700, मोसंबी : (3 डझन): 150- 350, (4 डझन) : 60-160, संत्रा : (10 किलो) : 150-600, डाळिंब (प्रतिकिलो) : भगवा : 60-200, गणेश : 10-30, आरक्ता 10-60, कलिंगड : 5-13, खरबूज : 10-20, पपई : 5-20, चिक्कू (दहा किलो) : 100-500. सीताफळ (एक किलो) : 20-180, पेरु (वीस किलो) 300-500, बोरे (दहा किलो) चमेली : 320-350, उमराण : 150-180, चेकनट : 650-850, चण्यामण्या : 800-900
हेही वाचा :
Market News : लसूण, काकडी महागली; फ्लॉवर, कोबी, वांगी स्वस्त
पुणे शहरात 40 टक्के फुटपाथवर अतिक्रमणे
The post Market News : आंबट-गोड बोरे बाजारात आली appeared first on पुढारी.
पुणे : गोड, आंबट चवीचे बोर म्हटल्यावर कुणाच्याही तोंडाला पाणी सुटेल. याच बोरांचा हंगाम सध्या सुरू झाला असून सोलापूर तसेच राजस्थान येथून बोरे बाजारात दाखल होऊ लागली आहेत. गुलटेकडी मार्केट यार्डातील घाऊक फळबाजारात बोरांच्या दहा किलोला 150 ते 900 रुपयांपर्यंतचा भाव मिळत आहे. किरकोळ बाजारात या बोरांची 50 ते 120 रुपये या दराने विक्री सुरू …
The post Market News : आंबट-गोड बोरे बाजारात आली appeared first on पुढारी.