‘अरे’ला ‘कारे’ने उत्तर..! चीनी सैनिकांशी लडाखमधील मेंढपाळ ‘भिडले’!

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : लडाखमध्‍ये चिनी सैनिकांनी पुन्‍हा एकदा खोडसाळपणा केल्‍याचा स्‍पष्‍ट झाले आहे. सोशल मीडियावर लडाखमधील मेंढपाळ आणि चिनी सैनिकांचा  व्‍हिडिओ व्‍हायरल झाल्‍याने हे प्रकरण उजेडात आले आहे. या व्‍हिडिओमध्‍ये प्रत्‍यक्ष नियंत्रण रेषे (‘एलएसी’) जवळ लडाखमधील मेढपाळांना मेंढ्या चरण्‍यापासून चीनी सैनिक राेखताना दिसत आहेत. याचवेळी अत्‍यंत निर्भयपणे मेढपाळांनी त्‍यांना उत्तर दिल्‍याचे दिसते. हा व्हिडिओ … The post ‘अरे’ला ‘कारे’ने उत्तर..! चीनी सैनिकांशी लडाखमधील मेंढपाळ ‘भिडले’! appeared first on पुढारी.
‘अरे’ला ‘कारे’ने उत्तर..! चीनी सैनिकांशी लडाखमधील मेंढपाळ ‘भिडले’!

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्‍क : लडाखमध्‍ये चिनी सैनिकांनी पुन्‍हा एकदा खोडसाळपणा केल्‍याचा स्‍पष्‍ट झाले आहे. सोशल मीडियावर लडाखमधील मेंढपाळ आणि चिनी सैनिकांचा  व्‍हिडिओ व्‍हायरल झाल्‍याने हे प्रकरण उजेडात आले आहे. या व्‍हिडिओमध्‍ये प्रत्‍यक्ष नियंत्रण रेषे (‘एलएसी’) जवळ लडाखमधील मेढपाळांना मेंढ्या चरण्‍यापासून चीनी सैनिक राेखताना दिसत आहेत. याचवेळी अत्‍यंत निर्भयपणे मेढपाळांनी त्‍यांना उत्तर दिल्‍याचे दिसते. हा व्हिडिओ पूर्व लडाखमधील असल्याचे सांगण्यात येत आहे.( Ladakh Shepherds Seen Arguing With China Soldiers Over Grazing Rights Near LAC )
मेंढपाळांच्‍या प्रतिकाराने चीन सैनिक माघारी फिरले
गलवान येथे २०२० मध्‍ये भारत आणि चीनच्‍या सैनिकांमध्‍ये धुमश्‍चक्री उडाली होती. त्याचवेळी भारतीय लष्कराने या भागात सुरक्षा वाढवली होती. तेव्‍हापासून लडाखमधील मेंढपाळांनी प्रत्‍यक्ष नियंत्रण रेषेजवळ गुरे चरण बंद केले होते. यानंतर प्रथमच लडाखमधील मेंढपाळ पुन्‍हा एकदा या भागात चराईसाठी मेंढ्या घेवून गेले. यावेळी नेहमीप्रमाणे चीनच्‍या सैनिकांनी त्‍यांच्‍यावर अरेरावी करत त्‍यांना माघारी फिरण्‍याची धमकी दिली.  मात्र लडाखमधील मेंढपाळांनी चिनी सैनिकांना प्रतिकार करत सडेतोड प्रत्‍युत्तर देत त्‍यांनाच माघारी जाण्‍यास भाग पाडले. ( Ladakh Shepherds Seen Arguing With China Soldiers Over Grazing Rights Near LAC )
Ladakh Shepherds : दगड हातात घेवून चीनी सैनिकांचा प्रतिकार
सोशल मीडियावरील या व्हिडिओमध्ये सुमारे तीन चिनी चिलखती वाहने आणि अनेक सैनिक घटनास्थळी दिसत आहेत. वाहने अलार्म वाजवतात, मेंढपालांना निघून जाण्याचा इशारा देतात; पण लडाखी मेंढपाळ येथेच मेंढ्यांना चराईसाठी साेडणार यावर आग्रही राहतात. ते चीनी सैनिकांना म्‍हणतात की, आम्‍ही भारतीय हद्दीत गुरे चरात आहोत. याला विरोध करणार्‍या चीन सैनिकांना लडाखचे मेंढपाळ हातात दगड घेत प्रतिकारही करतात. व्हिडिओमध्ये दिसणारे चिनी सैनिक सशस्त्र नाहीत.
मी भारतीय लष्कराचे आभार मानतो…
लोकप्रतिनिधी कोंचोक स्‍टॅननिज यांनी स्‍थानिक मेंढपाळांनी दाखवलेल्‍या धाडसाचे कौतुक केले आहे. तसेच त्‍यांना पाठिंबा देणार्‍या भारतीय सैन्‍याचेही आभार मानले आहेत. त्‍यांनी आपल्‍या त्यांनी ट्विटरवरील पोस्टमध्ये म्‍हटले आहे की, पूर्व लडाखच्या सीमावर्ती भागात पशुपालक आणि भटक्या लोकांना सुविधा देण्यावर भारतीय लष्कराने केलेला सकारात्मक परिणाम पाहून आनंद झाला. इतके मजबूत नागरी-लष्करी संबंध राखल्याबद्दल आणि सीमावर्ती भागातील लोकांचे हित जपल्याबद्दल मी भारतीय लष्कराचे आभार मानतो.’
भारतीय सैन्‍यामुळेच मेंढपाळ चीनी सैनिकांना धैर्याने तोंड देऊ शकले…
भारतीय सैन्याच्या पाठिंब्यामुळे मेंढपाळ चिनी सैनिकांचा धैर्याने सामना करू शकले. चराईचे प्रश्न सोडवण्यासाठी आमचे सैन्य नेहमीच नागरिकांसोबत असते यात शंका नाही. त्यांच्या पाठिंब्यामुळेच आमचे मेंढपाळ चीनी सैनिकांना धैर्याने तोंड देऊ शकले, असेही त्‍यांनी आपल्‍या पोस्‍टमध्‍ये नमूद केले आहे.
अलीकडेच भारताचे लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे यांनी ‘एलएसी’वरील परिस्थिती स्थिर असली तरी संवेदनशील असल्याचे म्हटले होते. गेल्या वर्षभरात, आमच्यामध्ये इतर कोणतेही विवादित क्षेत्र नाहीत. तोडगा काढण्याच्या आमच्या प्रयत्नांच्या संदर्भात, लष्करी स्तरावर तसेच राजनैतिक स्तरावरही आमची चर्चा सुरू असल्‍याचे त्‍यांनी स्‍पष्‍ट केले होते.

It is heartening to see the positive impact made by @firefurycorps_IA
in Border areas of Eastern Ladakh in facilitating the graziers & nomads to assert their rights in traditional grazing grounds along the north bank of Pangong.
I would like to thank #IndianArmy for such strong… pic.twitter.com/yNIBatPRKE
— Konchok Stanzin (@kstanzinladakh) January 30, 2024

हेही वाचा:

Aksai Chin : भारताच्या अक्साई चीनमध्ये चीनचे बोगदे!
Indo-China Tension : लडाखमधील स्थितीच्या अनुषंगाने भारत-चीन दरम्यान कुटनीतीक चर्चा

Latest Marathi News ‘अरे’ला ‘कारे’ने उत्तर..! चीनी सैनिकांशी लडाखमधील मेंढपाळ ‘भिडले’! Brought to You By : Bharat Live News Media.