आणेतील मोबाईल शाॅपी चोरीचा छडा ; एकास अटक, एक फरार

आळेफाटा : पुढारी वृत्तसेवा : आणे (ता. जुन्नर) येथील मोबाईल चोरीचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाला अवघ्या दोन दिवसात यश आले. याप्रकरणी एकजणास अटक करत 60 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सागर बबन मधे (वय 27 रा. गुऱ्हेवाडी ता. पारनेर, जि. नगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत माहिती अशी आणे … The post आणेतील मोबाईल शाॅपी चोरीचा छडा ; एकास अटक, एक फरार appeared first on पुढारी.

आणेतील मोबाईल शाॅपी चोरीचा छडा ; एकास अटक, एक फरार

आळेफाटा : Bharat Live News Media वृत्तसेवा : आणे (ता. जुन्नर) येथील मोबाईल चोरीचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाला अवघ्या दोन दिवसात यश आले. याप्रकरणी एकजणास अटक करत 60 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सागर बबन मधे (वय 27 रा. गुऱ्हेवाडी ता. पारनेर, जि. नगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
याबाबत माहिती अशी आणे येथे शनिवारी (दि. 27) मध्यरात्रीनंतर योगेश गांडाळ यांची आर्यन मोबाईल शॉपी फोडून अज्ञात चोरट्याने विविध कंपन्यांचे एक लाख रुपये किंमतीचे सात मोबाईल चोरून नेले होते. गांडाळ यांनी आळेफाटा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक अभिजित सावंत पोलिस हवालदार दिपक साबळे, संदिप वारे, अक्षय नवले यांनी सुरू केला होता. पथकाने
दरम्यान गुन्हा हा सागर मधे व एका साथीदराने केल्याचे या पथकाला समजले. आरोपींचा शोध घेत असताना सागर मधे शिंदेवाडी मोबाईल विक्री करण्यासाठी येणार असल्याचे समजले. शिंदेवाडी येथे या पथकाने सापळा लावून सागर मधे याला ताब्यात घेतले. त्याचेकडे या गुन्ह्याबाबत सखोल चौकशी केली असता त्याने हा गुन्हा साथीदार किरण नावजी जाधव (रा. भोसरमळा, गुऱ्हेवाडी ता. पारनेर) याचे मदतीने केल्याची कबुली दिली.
दरम्यान त्याच्या ताब्यातून अंदाजे 60 हजार रुपये किमतीचे चोरीतील चार मोबाइल जप्त केले. त्यास अटक करत पुढील कार्यवाहीसाठी आळेफाटा पोलिसांचे ताब्यात दिले. फरार आरोपीचा शोध सुरू आहे.
Latest Marathi News आणेतील मोबाईल शाॅपी चोरीचा छडा ; एकास अटक, एक फरार Brought to You By : Bharat Live News Media.