अंकिता लोखंडे स्टारर “स्वातंत्र्य वीर सावरकर” रिलीजसाठी सज्ज

पुढारी ऑनलाईन डेस्क : छोट्या पडद्यावरील ‘बिग बॉस १७’ मध्ये गौरवशाली प्रवास संपल्यानंतर अभिनेत्री अंकिता लोखंडे ( Ankita Lokhande ) आगामी “स्वातंत्र्य वीर सावरकर” या नव्या चित्रपटात दिसणार आहे. आता या चित्रपटाची रिलीज डेट सुद्धा ठरली असून २२ मार्च २०२४ रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. संबंधित बातम्या Jacqueline Fernandez : ‘जॅकलिनने जाणुनबुजून सुकेश … The post अंकिता लोखंडे स्टारर “स्वातंत्र्य वीर सावरकर” रिलीजसाठी सज्ज appeared first on पुढारी.
अंकिता लोखंडे स्टारर “स्वातंत्र्य वीर सावरकर” रिलीजसाठी सज्ज

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : छोट्या पडद्यावरील ‘बिग बॉस १७’ मध्ये गौरवशाली प्रवास संपल्यानंतर अभिनेत्री अंकिता लोखंडे ( Ankita Lokhande ) आगामी “स्वातंत्र्य वीर सावरकर” या नव्या चित्रपटात दिसणार आहे. आता या चित्रपटाची रिलीज डेट सुद्धा ठरली असून २२ मार्च २०२४ रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
संबंधित बातम्या

Jacqueline Fernandez : ‘जॅकलिनने जाणुनबुजून सुकेश चंद्रशेखरच्या पैशांचा वापर केला’
Fighter Box Office : वर्ल्डवाईड २५० कोटींच्या टप्पा लवकरच गाठणार फायटर
Ashok Saraf : अशोक सराफ : चतुरस्र अभिनेता

 
आगामी “स्वातंत्र्य वीर सावरकर” या देशभक्तीपर आधारित चित्रपटात अंकिता ( Ankita Lokhande ) रणदीप हुड्डासोबत दिसणार आहे. स्वातंत्र्य वीर सावरकर हा चित्रपट सर्वात अपेक्षित चित्रपटांपैकी एक आहे आणि प्रेक्षक चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेच्या अपडेटची आतुरतेने वाट पाहत होते. दरम्यान रणदीप हुड्डा आणि अंकिता लोखंडे स्टारर ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ २२ मार्च २०२४ रोजी मोठ्या पडद्यावर येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
नुकतेच अभिनेता रणदीप हुड्डा यांनी त्याच्या इन्स्टाग्रामवर एक आगामी “स्वातंत्र्य वीर सावरकर” चित्रपटातील एक पोस्टर शेअर केलं आहे. या पोस्टरमध्ये रणदीप हे वीर सावरकर याच्या भूमिकेत दिसत आहेत. या पोस्टरच्या कॅप्शनमध्ये त्यांनी ‘भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील दोन नायक; एक साजरा केला आणि एक इतिहासातून काढून टाकला #शहीददिन 2024 रोजी – इतिहास पुन्हा लिहिला जाईल.’ असे लिहिले आहे.
यावरून ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ हा चित्रपट शहीद दिन म्हणजे, २२ मार्च २०२४ रोजी चाहत्याच्या भेटीस येत आहे. ‘बिग बॉस १७’ मध्ये यशस्वीपणे चाहत्यांची मने जिंकल्यानंतर अंकिता लोखंडे आता तिच्या चित्रपटाच्या रिलीजसाठी सज्ज होताना दिसत आहे.

 

View this post on Instagram

 
A post shared by Randeep Hooda (@randeephooda)

 

View this post on Instagram

 
A post shared by Randeep Hooda (@randeephooda)

 

View this post on Instagram

 
A post shared by Randeep Hooda (@randeephooda)

Latest Marathi News अंकिता लोखंडे स्टारर “स्वातंत्र्य वीर सावरकर” रिलीजसाठी सज्ज Brought to You By : Bharat Live News Media.