राणीच्या बागेतील मत्सालयाचा प्रकल्प वादात
मुंबई (mumbai) महापालिकेने भायखळ्याच्या प्राणीसंग्राहलयात एक छोटे मस्त्यालय उभारण्याचे ठरवले आहे. हा प्रकल्प सुरू होण्याआधी वादात (controversy) सापडला आहे. टनेल स्वरूपाचे हे मस्त्यालय (aquarium) अतिशय कमी जागेत बांधले जाणार आहे. त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण होऊ शकतो. तसेच या प्रकल्पाचा 65 कोटी रुपये खर्च जास्त असल्याचा आरोप समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी केला आहे.भायखळ्याच्या (byculla) जिजामाता उद्यान व प्राणीसंग्रहालयात एक ‘एक्वा गॅलरी’ तयार करण्याचे ठरवले असून त्याची घोषणा चालू आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात केली आहे. पेंग्विन कक्षासमोरील 5000 चौरस फूट जागेत हे लहानसे मस्त्यालय तयार करण्यात येणार आहे. बोगदा स्वरूपाच्या या मस्त्यालयात 360 अंशातून मासे आणि समुद्री जीव, प्रवाळ पाहता येणार आहेत. पालिकेने या कामासाठी 65 कोटी अंदाजित खर्चाच्या निविदा मागवल्या होत्या. मात्र या प्रकल्पावर आणि निविदा प्रक्रियेवर समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी आक्षेप घेतला आहे. ही निविदा रद्द करण्याची मागणी रईस शेख यांनी केली आहे.रईस शेख यांनी मुंबई महानगरपालिका (bmc) आयुक्त भूषण गगराणी यांना याबाबत पत्र पाठवले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, पेंग्विन कक्षासमोरील पाच हजार चौरस फूट जागेत हे मत्स्यालय उभारण्यात येणार आहे. तसेच या जागेची उंची 20 फुटापेक्षाही कमी आहे. आधीच या जागेत पेंग्विन बघायला येणाऱ्यांची गर्दी असते. त्यामुळे कोणतीही अनुचित घटना घडल्यास या अरुंद जागेत चेंगराचेंगरी होऊ शकते, अशी भीती रईस शेख यांनी व्यक्त केली आहे. शिवाय मत्स्यालयाच्या लहान आकारामुळे पर्यटकाना मत्स्यालय पाहण्यास पुरेशी जागा मिळणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.अतिशय कमी जागा असूनही मस्त्यालय उभारणीसाठी अंदाजित केलेला 65 कोटींचा खर्च जास्त आल्याचाही आरोप त्यांनी केला आहे. तसेच निविदा प्रक्रियेत फक्त एकाच निविदाकाराने भाग घेतला असल्याबद्दलही रईस शेख यांनी आक्षेप घेतला आहे. निविदा प्रक्रियेत अनियमितता झाली असल्याचा आरोप करीत त्यांनी ही निविदा त्वरित रद्द करण्याची मागणी केली आहे. तसेच प्रकल्पाच्या ढिसाळ नियोजनासाठी अधिकारी आणि सल्लागारांची चौकशी करण्याची मागणीही केली आहे. हे मस्त्यालय भविष्यात मृत्यूचा सापळा बनू शकेल. हे मत्स्यालय मफतलाल मिलच्या जमिनीवर स्थलांतरित करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.हेही वाचामुंबईच्या वाहतूक समस्येवर जलवाहतूकीचा प्रस्तावचेंबूरमधील मेट्रोचे बांधकाम कोसळले
Home महत्वाची बातमी राणीच्या बागेतील मत्सालयाचा प्रकल्प वादात
राणीच्या बागेतील मत्सालयाचा प्रकल्प वादात
मुंबई (mumbai) महापालिकेने भायखळ्याच्या प्राणीसंग्राहलयात एक छोटे मस्त्यालय उभारण्याचे ठरवले आहे. हा प्रकल्प सुरू होण्याआधी वादात (controversy) सापडला आहे. टनेल स्वरूपाचे हे मस्त्यालय (aquarium) अतिशय कमी जागेत बांधले जाणार आहे. त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण होऊ शकतो.
तसेच या प्रकल्पाचा 65 कोटी रुपये खर्च जास्त असल्याचा आरोप समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी केला आहे.भायखळ्याच्या (byculla) जिजामाता उद्यान व प्राणीसंग्रहालयात एक ‘एक्वा गॅलरी’ तयार करण्याचे ठरवले असून त्याची घोषणा चालू आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात केली आहे.
पेंग्विन कक्षासमोरील 5000 चौरस फूट जागेत हे लहानसे मस्त्यालय तयार करण्यात येणार आहे. बोगदा स्वरूपाच्या या मस्त्यालयात 360 अंशातून मासे आणि समुद्री जीव, प्रवाळ पाहता येणार आहेत.
पालिकेने या कामासाठी 65 कोटी अंदाजित खर्चाच्या निविदा मागवल्या होत्या. मात्र या प्रकल्पावर आणि निविदा प्रक्रियेवर समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी आक्षेप घेतला आहे. ही निविदा रद्द करण्याची मागणी रईस शेख यांनी केली आहे.
रईस शेख यांनी मुंबई महानगरपालिका (bmc) आयुक्त भूषण गगराणी यांना याबाबत पत्र पाठवले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, पेंग्विन कक्षासमोरील पाच हजार चौरस फूट जागेत हे मत्स्यालय उभारण्यात येणार आहे. तसेच या जागेची उंची 20 फुटापेक्षाही कमी आहे.
आधीच या जागेत पेंग्विन बघायला येणाऱ्यांची गर्दी असते. त्यामुळे कोणतीही अनुचित घटना घडल्यास या अरुंद जागेत चेंगराचेंगरी होऊ शकते, अशी भीती रईस शेख यांनी व्यक्त केली आहे.
शिवाय मत्स्यालयाच्या लहान आकारामुळे पर्यटकाना मत्स्यालय पाहण्यास पुरेशी जागा मिळणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.
अतिशय कमी जागा असूनही मस्त्यालय उभारणीसाठी अंदाजित केलेला 65 कोटींचा खर्च जास्त आल्याचाही आरोप त्यांनी केला आहे. तसेच निविदा प्रक्रियेत फक्त एकाच निविदाकाराने भाग घेतला असल्याबद्दलही रईस शेख यांनी आक्षेप घेतला आहे.
निविदा प्रक्रियेत अनियमितता झाली असल्याचा आरोप करीत त्यांनी ही निविदा त्वरित रद्द करण्याची मागणी केली आहे. तसेच प्रकल्पाच्या ढिसाळ नियोजनासाठी अधिकारी आणि सल्लागारांची चौकशी करण्याची मागणीही केली आहे.
हे मस्त्यालय भविष्यात मृत्यूचा सापळा बनू शकेल. हे मत्स्यालय मफतलाल मिलच्या जमिनीवर स्थलांतरित करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.हेही वाचा
मुंबईच्या वाहतूक समस्येवर जलवाहतूकीचा प्रस्ताव
चेंबूरमधील मेट्रोचे बांधकाम कोसळले