कोंडुरे येथे रास्त धान्य दुकान मंजूर

हेमंत मराठे यांच्या मागणीलाही यश ! न्हावेली / वार्ताहर सावंतवाडी तालुक्यातील कोंडुरे या गावात रास्त धान्य दुकान नसल्याने या ठिकाणच्या ग्राहकांना सुमारे साडेतीन ते चार किलोमीटरची पायपीट करून मळेवाड येथे असलेल्या रास्त धान्य दुकानावर धान्य उचलण्यासाठी यावे लागत होते.धान्य उचल करण्यासाठी ग्रामस्थांची होणारी दमछाक त्याचप्रमाणे वयोवृद्ध व्यक्ती व महिला यांनाही शारीरिक त्रास सहन करावा लागत […]

कोंडुरे येथे रास्त धान्य दुकान मंजूर

हेमंत मराठे यांच्या मागणीलाही यश !
न्हावेली / वार्ताहर
सावंतवाडी तालुक्यातील कोंडुरे या गावात रास्त धान्य दुकान नसल्याने या ठिकाणच्या ग्राहकांना सुमारे साडेतीन ते चार किलोमीटरची पायपीट करून मळेवाड येथे असलेल्या रास्त धान्य दुकानावर धान्य उचलण्यासाठी यावे लागत होते.धान्य उचल करण्यासाठी ग्रामस्थांची होणारी दमछाक त्याचप्रमाणे वयोवृद्ध व्यक्ती व महिला यांनाही शारीरिक त्रास सहन करावा लागत होता.यामुळे मळेवाड आणि कोंडुरे ही ग्रुप ग्रामपंचायत असून कोंडुरे हा महसुली वेगळा गाव असल्याने या ठिकाणी नव्याने रास्त धान्य दुकान परवाना मिळावा अशी मागणी मळेवाड – कोंडुरे उपसरपंच हेमंत मराठे यांनी तहसीलदार श्रीधर पाटील यांना निवेदन देऊन केली होती.या मागणीचा विचार करून नव्याने जाहीर करण्यात आलेल्या रास्तधान्य दुकान परवाना प्रसिद्धी पत्रकामध्ये सावंतवाडी तालुक्यातील कोंडुरे गावाचा समावेश करण्यात आला असल्याने हेमंत मराठे यांची कोंडुरे येथे रास्त धान्य दुकान परवाना मिळावा या मागणी यश आले आहे.कोंडुरे येथे रास्ता धान्य दुकान सुरू झाल्यास ग्रामस्थांची होणारी गैरसोय दूर होणार आहे.यामुळे ग्रामस्थांतून समाधान व्यक्त केले जात आहे.