केंद्रीय मंत्र्यांना खासगी सचिव नियुक्तीची मंजुरी

नितिन गडकरी, हरदीप सिंह पुरी यांचा समावेश नवी दिल्ली : केंद्रात तिसऱ्यांदा मोदी सरकार स्थापन झाल्यावर मंत्र्यांच्या खासगी सचिवांचीही नियुक्ती केली जात आहे. याचनुसार गुरुवारी चार मंत्र्यांच्या खासगी सचिवांच्या नियुक्तीला मंजुरी मिळाली आहे. या मंत्र्यांमध्ये केंद्रीय परिवहन मंत्री नितिन गडकरी, पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी, वस्त्राsद्योग मंत्री गिरिराज सिंह आणि ऊर्जामत्री मनोहरलाल खट्टर सामील आहेत. […]

केंद्रीय मंत्र्यांना खासगी सचिव नियुक्तीची मंजुरी

नितिन गडकरी, हरदीप सिंह पुरी यांचा समावेश
नवी दिल्ली : केंद्रात तिसऱ्यांदा मोदी सरकार स्थापन झाल्यावर मंत्र्यांच्या खासगी सचिवांचीही नियुक्ती केली जात आहे. याचनुसार गुरुवारी चार मंत्र्यांच्या खासगी सचिवांच्या नियुक्तीला मंजुरी मिळाली आहे. या मंत्र्यांमध्ये केंद्रीय परिवहन मंत्री नितिन गडकरी, पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी, वस्त्राsद्योग मंत्री गिरिराज सिंह आणि ऊर्जामत्री मनोहरलाल खट्टर सामील आहेत. नितिन गडकरी यांचे खासगी सचिव म्हणून दीपक अर्जुन शिंदे कायम राहणार आहेत. दीपक हे 2012 च्या तुकडीचे आयएएस अधिकारी आहेत. खट्टर यांचे खासगी सचिव म्हणून 2011 च्या तुकडीचे आयएएस अधिकारी विजय दत्त यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हरदीप पुरी यांचे खासगी सचिव रसाल द्विवेदी असणार आहेत. रसाल हे आयआरएस अधिकारी आहेत. तर गिरिराज सिंह यांच्या खासगी सचिवपदी रमण कुमार हेच कायम राहणार आहेत. रमण कुमार हे 2009 च्या तुकडीचे आयएएस अधिकारी आहेत. गडकरींचे खासगी सचिव अर्जुन शिंदे यांना 31 ऑगस्ट 2026 पर्यंतच्या कालावधीसाठी नियुक्त करण्यात आले आहे. तर हरदीप सिंह पुरी यांचे खासगी सचिव रसाल द्विवेदी हे 15 मार्च 2026 पर्यंतच्या कालावधीसाठी उपसचिव स्तरावर नियुक्त असतील.