कलाकार मानधनापासून यापुढे एकही कलावंत वंचित राहणार नाही : संतोष कानडे

सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यातील कलाकारांना मंजुरीचे पत्र वितरीत सावंतवाडी – शासनाच्या राजश्री शाहू महाराज कलाकार मानधन पासून यापुढे एकही कलावंत वंचित राहणार नाही. प्रत्येकाला या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी आमचे प्रामाणिकपणे प्रयत्न असतील. तसेच लवकरच सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून भेट घेऊन कलाकारांच्या समस्या आपण मांडणार आहे, असे या समितीचे […]

कलाकार मानधनापासून यापुढे एकही कलावंत वंचित राहणार नाही : संतोष कानडे

सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यातील कलाकारांना मंजुरीचे पत्र वितरीत
सावंतवाडी –
शासनाच्या राजश्री शाहू महाराज कलाकार मानधन पासून यापुढे एकही कलावंत वंचित राहणार नाही. प्रत्येकाला या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी आमचे प्रामाणिकपणे प्रयत्न असतील. तसेच लवकरच सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून भेट घेऊन कलाकारांच्या समस्या आपण मांडणार आहे, असे या समितीचे जिल्हाध्यक्ष संतोष कानडे यांनी सांगितले.सावंतवाडी भाजपा कार्यालयात मानधन मंजूर झालेल्या सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यातील कलाकारांना मंजुरीचे पत्र देण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी नगरसेवक मनोज नाईक, जिल्हा बँक संचालक रवींद्र मडगावकर, माजी जि.प. सभापती अंकुश जाधव, समितीचे सावंतवाडी सदस्य राजाराम धुरी आदी उपस्थित होते.
अलीकडेच जिल्ह्यातील १०० कलाकारांना मानधन मंजूर झाले होते. या सर्व कलाकारांची मंजूर पत्र मिळाली नव्हती. पण प्रत्येक तालुक्यात या समितीचे अध्यक्ष संतोष कानडे हे स्वतः जातात आणि त्यांच्या हातात पत्र देत आहेत. शिवाय कलाकारांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही देत आहेत. आता मानधन मंजूर प्राप्त कलाकारांना पत्रे मिळाली. त्यांना लवकरच मानधन त्यांच्या बँक खात्यात जमा होणार असल्याचे सांगितले. शिवाय वर्षाला शंभर प्रस्ताव मंजूर होतात. त्यातच कलाकारांच्या विविध मागण्या आहेत. या मागण्यांची पूर्तता करण्यासाठी लवकरच सांस्कृतिक मंत्री मुनगंटीवार यांची आपण आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून भेट घेणार असल्याची ग्वाही त्यांनी याप्रसंगी दिली. दोडामार्ग व सावंतवाडी या तालुक्यातील १५ जणांना मंजूर पत्रे मान्यवरांच्या उपस्थितीत देण्यात आली.

Go to Source