कौतुकाने लिहिण्याचे बळ मिळते
कवयित्री पूजा भडांगे : मराठी प्रबोधिनीतर्फे साहित्यिकांचा गौरव
बेळगाव : कौतुकाने लिहिण्याचे बळ मिळते आणि पाठीवर मिळालेली एक थाप लढण्याचे बळ देते. माझ्या पहिल्यावहिल्या कवितेचे सादरीकरण वि. गो. साठे प्रबोधिनीच्या बालसाहित्य संमेलनातच केले होते. आज अनेक वर्षानंतर त्याच व्यासपीठावर एक लेखिका म्हणून सत्कार स्वीकारत आहे, याचा आनंद आहे. यामुळे एखाद्या कलाकृतीचे वेळीच कौतुक झाल्यास ती प्रतिभा खुलत जाते, असे विचार लेखिका व कवयित्री पूजा भडांगे यांनी मांडले. गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनी आणि राज्य मराठी विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. मराठी विद्यानिकेतन शाळेच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. व्यासपीठावर शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष सुभाष ओऊळकर, वि. गो. साठे प्रबोधिनीचे मालोजी अष्टेकर, प्राचार्य आनंद मेणसे, प्रताप सिंह चव्हाण यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळायला हवा
प्रा. आनंद मेणसे म्हणाले, इतर भाषांप्रमाणेच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळायला हवा. यासाठी प्रत्येकाने प्रयत्नशील राहणे गरजेचे आहे. आज बेळगावसारख्या लढवय्या मराठमोळ्या गावात एक मराठी पुस्तक विक्री केंद्र आपण जगवू शकत नाही ही बाब लाजीरवाणी असल्याचे त्यांनी सांगितले. प्रताप सिंह चव्हाण यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. ज्योती सेंट्रल स्कूलच्या मुख्याध्यापिका माया जायाण्णाचे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कमल हलगेकर यांनी परिचय करून दिला. इंद्रजित मोरे यांनी आभार मानले.
Home महत्वाची बातमी कौतुकाने लिहिण्याचे बळ मिळते
कौतुकाने लिहिण्याचे बळ मिळते
कवयित्री पूजा भडांगे : मराठी प्रबोधिनीतर्फे साहित्यिकांचा गौरव बेळगाव : कौतुकाने लिहिण्याचे बळ मिळते आणि पाठीवर मिळालेली एक थाप लढण्याचे बळ देते. माझ्या पहिल्यावहिल्या कवितेचे सादरीकरण वि. गो. साठे प्रबोधिनीच्या बालसाहित्य संमेलनातच केले होते. आज अनेक वर्षानंतर त्याच व्यासपीठावर एक लेखिका म्हणून सत्कार स्वीकारत आहे, याचा आनंद आहे. यामुळे एखाद्या कलाकृतीचे वेळीच कौतुक झाल्यास ती […]