ग्राम पंचायतमध्ये अनुकंपा तत्त्वावर नियुक्त्या

जिल्ह्यातील ग्राम पंचायतमध्ये 37 कर्मचाऱ्यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते नियुक्तीचे आदेशपत्र वितरित बेळगाव : अनुकंपा आधारावर जिल्ह्यातील वेगवेगळ्या ग्राम पंचायतींमध्ये नोकरी देण्यात आलेल्या 37 कर्मचाऱ्यांना शुक्रवारी पालकमंत्र्यांच्या हस्ते नियुक्तीचे आदेशपत्र वितरित करण्यात आले. विकास आढावा बैठकीनंतर हा कार्यक्रम झाला. सुवर्ण विधानसौधमध्ये शुक्रवारी पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील विकासकामांची आढावा बैठक झाली. ग्राम पंचायतीत सेवेत असताना मृत्युमुखी […]

ग्राम पंचायतमध्ये अनुकंपा तत्त्वावर नियुक्त्या

जिल्ह्यातील ग्राम पंचायतमध्ये 37 कर्मचाऱ्यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते नियुक्तीचे आदेशपत्र वितरित
बेळगाव : अनुकंपा आधारावर जिल्ह्यातील वेगवेगळ्या ग्राम पंचायतींमध्ये नोकरी देण्यात आलेल्या 37 कर्मचाऱ्यांना शुक्रवारी पालकमंत्र्यांच्या हस्ते नियुक्तीचे आदेशपत्र वितरित करण्यात आले. विकास आढावा बैठकीनंतर हा कार्यक्रम झाला. सुवर्ण विधानसौधमध्ये शुक्रवारी पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील विकासकामांची आढावा बैठक झाली. ग्राम पंचायतीत सेवेत असताना मृत्युमुखी पडलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना अनुकंपा आधारावर नोकऱ्या देण्यात आल्या आहेत. या सर्व 37 जणांना नियुक्तीपत्र वितरित करण्यात आले.
निवड समितीच्या बैठकीत 37 जणांची नियुक्ती
जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांच्या नेतृत्वाखाली  झालेल्या निवड समितीच्या बैठकीत या 37 जणांची नियुक्ती करण्यात आली आहे. अथणी व बेळगाव तालुक्यात प्रत्येकी 6, सौंदत्ती तालुक्यात 5, खानापूर तालुक्यात 2, बैलहोंगल तालुक्यात 3, रामदुर्ग तालुक्यात 4, मुडलगी, कित्तूर व गोकाक तालुक्यात प्रत्येकी 1, रायबाग तालुक्यात 2, हुक्केरी व चिकोडी तालुक्यात प्रत्येकी 3 अशा 37 जणांची अनुकंपा आधारावर नोकरीसाठी नियुक्ती झाली आहे. यावेळी रायबागचे आमदार दुर्योधन ऐहोळे, बेळगाव उत्तरचे आमदार राजू सेठ, बैलहोंगलचे आमदार महांतेश कौजलगी, खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर, कित्तूरचे आमदार बाबासाहेब पाटील, कुडचीचे आमदार महेंद्र तम्मण्णावर, जिल्हाधिकारी नितेश पाटील, जि. पं. चे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.