मनपा प्रभारी आयुक्तपदी राजश्री जैनापूर यांची वर्णी

बेळगाव : महानगरपालिकेच्या प्रभारी आयुक्तपदी राजश्री जैनापूर यांची नियुक्ती झाली आहे. रविवारी त्यांनी आपला पदभार स्वीकारला. विद्यमान आयुक्त अशोक दुडगुंटी यांची आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रायचूरला बदली झाल्यामुळे हा बदल झाला आहे. राजश्री जैनापूर यांनी यापूर्वी बेळगावच्या प्रांताधिकारी म्हणून सेवा बजावली आहे. सध्या राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या रजिस्ट्रार म्हणून काम पहात होत्या. रविवारी त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर […]

मनपा प्रभारी आयुक्तपदी राजश्री जैनापूर यांची वर्णी

बेळगाव : महानगरपालिकेच्या प्रभारी आयुक्तपदी राजश्री जैनापूर यांची नियुक्ती झाली आहे. रविवारी त्यांनी आपला पदभार स्वीकारला. विद्यमान आयुक्त अशोक दुडगुंटी यांची आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रायचूरला बदली झाल्यामुळे हा बदल झाला आहे. राजश्री जैनापूर यांनी यापूर्वी बेळगावच्या प्रांताधिकारी म्हणून सेवा बजावली आहे. सध्या राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या रजिस्ट्रार म्हणून काम पहात होत्या. रविवारी त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर आरोग्याधिकारी डॉ. संजीव नांद्रे व इतर अधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.