ठाकरे शिवसेनेकडून नगराध्यक्षांसह १७ नगरसेवक उमेदवारांचे अर्ज

पक्षीय स्तरावर प्रथमच सर्वात जास्त उमेदवारी एका दिवसांत दाखल वेंगुर्ले (प्रतिनिधी)- नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रमांनुसार आज सहाव्या दिवशी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे नगराध्यक्ष पदाचा संदेश प्रभाकर निकम व नगरसेवक पदाचे १७ असे एकूण १८ उमेदवारी अर्ज निवडणूक निर्वाचन अधिकारी वेंगुर्ले तहसिलदार ओंकार ओतारी यांच्याकडेसादर करण्यात आले.या प्रसंगी उपस्थितात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख बाबुराव […]

ठाकरे शिवसेनेकडून नगराध्यक्षांसह १७ नगरसेवक उमेदवारांचे अर्ज

पक्षीय स्तरावर प्रथमच सर्वात जास्त उमेदवारी एका दिवसांत दाखल
वेंगुर्ले (प्रतिनिधी)-
नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रमांनुसार आज सहाव्या दिवशी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे नगराध्यक्ष पदाचा संदेश प्रभाकर निकम व नगरसेवक पदाचे १७ असे एकूण १८ उमेदवारी अर्ज निवडणूक निर्वाचन अधिकारी वेंगुर्ले तहसिलदार ओंकार ओतारी यांच्याकडेसादर करण्यात आले.या प्रसंगी उपस्थितात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख बाबुराव धुरी, सावंतवाडी विधानसभा मतदार संघ प्रमुख रूपेश राऊळ, वेंगुर्ले तालुका प्रमुख यशवंत उर्फ बाळु परब, शहर प्रमुख शैलेश परुळेकर तसेच नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संदेश प्रभाकर निकम, अजित राऊळ, सौ. सुमन निकम, तुषार सापळे, नगरसेवक पदाचे उमेदवार उपस्थित होते.वेंगुर्ले सुंदर भाटले येथील ठाकरे शिवसेना शाखेतून शिवसेना पदाधिकाऱ्यांसह ठाकरे सेनेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संदेश निकम व १७ नगरसेवक पदासाठीचे उमेदवार यांनी वेंगुर्लेचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वराचे दर्शन घेत वेंगुर्ले नगपरीषदेतील निवडणूक विभागाच्या दालनांत प्रवेश करून निवडणूक निर्वाचन अधिकारी वेंगुर्ले तहसिलदार ओंकार ओतारी यांचेकडे सादर करण्यात आले.ठाकरे सेनेच्या उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यात तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी तुळस विभाग प्रमुख संदिप पेडणेकर, उभादांडा विभाग प्रमुख सुजीत चमणकर, महिला आघाडी तालुका प्रमुख सौ. साक्षी चमणकर यासह अन्य पदाधिकारी निवडणूक कार्यालयाच्या ठिकाणी आले होते.