युवा निधीच्या अर्ज नोंदणीला प्रारंभ
नववर्षात मिळणार युवा निधीची रक्कम, तरुणांना दिलासा
बेळगाव : काँग्रेस सरकारच्या गॅरंटी योजनांतील पाचवी आणि महत्त्वाची असणाऱ्या युवा निधी योजनेच्या नोंदणीला प्रारंभ झाला आहे. पहिल्या दिवशी अर्ज नोंदणीसाठी म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. मात्र येत्या दोन दिवसांत युवा निधीच्या नोंदणीसाठी तरुणांची झुंबड उडणार आहे. काँग्रेस सरकारने निवडणुकीदरम्यान पाच गॅरंटी योजनांची घोषणा केली होती. त्यापैकी शक्ती, गृहज्योती, गृहलक्ष्मी आणि अन्नभाग्य योजनेला सुरुवात झाली आहे. मात्र मागील काही दिवसांपासून प्रलंबित असलेल्या युवा निधी योजनेच्या अर्ज स्वीकृतीला सुरुवात झाल्याने तरुणांना दिलासा मिळाला आहे. या योजनेंतर्गत पदवीधर विद्यार्थ्यांना मासिक 3 हजार तर डिप्लोमाधारक विद्यार्थ्यांना 1500 रुपये आर्थिक मदत दिली जाणार आहे.
शक्ती योजनेंतर्गत महिलांना मोफत बस प्रवास, अन्नभाग्य योजनेंतर्गत लाभार्थ्यांना रोख निधी, गृहज्योतीअंतर्गत 200 युनिट मोफत वीज, गृहलक्ष्मी अंतर्गत कुटुंबातील प्रमुख महिलेला मासिक 2 हजार रुपये दिले जात आहेत. त्यापाठोपाठ आता युवा निधी अंतर्गत पदवीधर तरुणांना 3000 तर डिप्लोमाधारकांना 1500 रुपये दिले जाणार आहेत. या योजनेच्या नोंदणीला मंगळवारपासून प्रारंभ झाला आहे. बेळगाव वन, कर्नाटक वन, ग्राम वन, बापुजी सेवा केंद्रावर अर्ज नोंदणीची सेवा उपलब्ध करण्यात आली आहे. नवीन वर्षात लाभार्थी तरुणांना युवा निधी अंतर्गत रक्कम मिळणार आहे. विशेषत: यामध्ये पारदर्शकता रहावी यासाठी ही रक्कम थेट लाभार्थी तरुणांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे. डिसेंबरअखेरीस युवा निधीसाठी नोंदणी करून घेतली जात असली तरी याची अंमलबजावणी 12 जानेवारीपासून होणार आहे. त्यामुळे नवीन वर्षात लाभार्थी तरुणांना युवा निधीची रक्कम हाती पडणार आहे.
गॅरंटी योजना विस्कळीत
काँग्रेसने दिलेल्या गॅरंटी योजना विस्कळीत झाल्या आहेत. गृहलक्ष्मीचे पैसे मिळत नसल्याच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढू लागल्या आहेत. काही लाभार्थ्यांना अन्नभाग्य योजनेंतर्गत रक्कम मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्याचबरोबर शक्ती योजनेंतर्गत महिलांचा मोफत प्रवास इतर प्रवाशांना त्रासदायक ठरू लागला आहे. त्यामुळे गॅरंटी योजना सर्वसामान्यांना सुरळीत मिळत नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत. त्यातच आता युवा निधीची अंमलबजावणी सुरू होणार आहे. त्यामुळे युवा निधी तरी लाभार्थी तरुणांना वेळेत आणि नियमित मिळणार का? असा प्रश्नही लाभार्थी तरुणांना पडला आहे.
युवा निधी नोंदणी योजनेला चालना
राज्य सरकारकडून पदवीधर तरुणांसाठी युवा निधी योजना सुरू करण्यात आली आहे. यासाठी नोंदणी प्रक्रियेला जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये चालना देण्यात आली. निवासी जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी यांच्या हस्ते कार्यक्रमाला चालना देण्यात आली. यावेळी जि. पं. अधिकारी बसवराज अडवीमठ, जिल्हा उद्योग विनिमय केंद्राचे रविशंकर चनाळ, जी. एस. कोरसगाव, जिल्हा कौशल्य विकास अधिकारी चिदानंद बाके, प्रशांत पाटील, श्रीशैल परगी उपस्थित होते.
Home महत्वाची बातमी युवा निधीच्या अर्ज नोंदणीला प्रारंभ
युवा निधीच्या अर्ज नोंदणीला प्रारंभ
नववर्षात मिळणार युवा निधीची रक्कम, तरुणांना दिलासा बेळगाव : काँग्रेस सरकारच्या गॅरंटी योजनांतील पाचवी आणि महत्त्वाची असणाऱ्या युवा निधी योजनेच्या नोंदणीला प्रारंभ झाला आहे. पहिल्या दिवशी अर्ज नोंदणीसाठी म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. मात्र येत्या दोन दिवसांत युवा निधीच्या नोंदणीसाठी तरुणांची झुंबड उडणार आहे. काँग्रेस सरकारने निवडणुकीदरम्यान पाच गॅरंटी योजनांची घोषणा केली होती. त्यापैकी शक्ती, […]