जगदीश शेट्टर यांच्याकडून अर्ज दाखल
बुधवारी पुन्हा एकदा भरणार उमेदवारी
बेळगाव : भाजपचे बेळगाव लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार जगदीश शेट्टर यांनी सोमवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. बुधवार दि. 17 एप्रिल रोजी शक्तिप्रदर्शनासह पुन्हा एकदा अर्ज दाखल केला जाणार आहे. सकाळी 10 वाजता समादेवी गल्ली येथील समादेवी मंदिरापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य मिरवणूक काढून शेट्टर आपला अर्ज दाखल करणार आहेत. जगदीश शेट्टर बुधवारी अर्ज दाखल करणार आहेत. परंतु, अर्ज भरताना कोणत्याही त्रुटी राहू नयेत, यासाठी सोमवारीच त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. बुधवारी शक्तिप्रदर्शन करून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी भाजपकडून जय्यत तयारी केली जात आहे. कार्यकर्त्यांची जमवाजमव केली जात असून रामनवमीच्या दिवशी हजारोंच्या उपस्थितीत शक्तिप्रदर्शनाची तयारी सुरू आहे. सोमवारी भाजपच्या निवडक पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जगदीश शेट्टर यांनी उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांकडे दाखल केला. बेळगावचे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी शेट्टर यांचा अर्ज स्वीकारला. यावेळी खासदार मंगला अंगडी, गोकाकचे आमदार रमेश जारकीहोळी, भाजपचे राज्य उपाध्यक्ष अनिल बेनके, विधान परिषद सदस्य हनुमंत निराणी यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
Home महत्वाची बातमी जगदीश शेट्टर यांच्याकडून अर्ज दाखल
जगदीश शेट्टर यांच्याकडून अर्ज दाखल
बुधवारी पुन्हा एकदा भरणार उमेदवारी बेळगाव : भाजपचे बेळगाव लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार जगदीश शेट्टर यांनी सोमवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. बुधवार दि. 17 एप्रिल रोजी शक्तिप्रदर्शनासह पुन्हा एकदा अर्ज दाखल केला जाणार आहे. सकाळी 10 वाजता समादेवी गल्ली येथील समादेवी मंदिरापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य मिरवणूक काढून शेट्टर आपला अर्ज दाखल करणार आहेत. जगदीश शेट्टर […]