‘लेट लूज’मध्ये अॅपलचा सर्वात लहान आयपॅड लाँच
आयपॅड एअर, मॅझिक किबोर्डसह पेन्सिल प्रोचेही लाँचिंग
दिल्ली :
तंत्रज्ञान क्षेत्रातील जगातील दिग्गज कंपनी अॅपलने आपला ‘लेट लूज’ हा इव्हेंट नुकताच सादर केला आहे. या कार्यक्रमात कंपनीने आयपॅड एअर, मॅझिक किबोर्ड आणि पेन्सिल प्रो, आयपॅड एअर आणि आयपॅड प्रो 11 इंच व 13 इंच या आकारातील डिस्प्लेंसह हे आयपॅड सादर करण्यात आले आहेत.
11 इंच आकाराच्या डिस्प्लेसह आयपॅड प्रोची जाडी 5.3 एमएम (0.21 इंच) राहणार आहे आणि 13 इंच डिस्प्लेची जाडी ही 5.1 एमएम(0.20 इंच) इतकी राहणार आहे. यामध्ये कंपनीने एम4 चिपसेट दिला आहे. यासोबतच एम2 चिपसेटसह आयपॅड एअर लाँच करण्यात आले आहे. हे उपकरण भारतात 15 मे पासून 99,900 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत उपलब्ध होणार असल्याची माहिती आहे.
आयपॅड एअर चार स्टोरेज पर्यायांमध्ये उपलब्ध
128 जीबी, 265 जीबी, 512जीबी आणि 1 टीबी या चार स्टोरेजसह आयपॅड एअरमध्ये 12 मेगापिक्सलच्या मुख्य कॅमेऱ्यासह 12 मेगापिक्सलचा फ्रंट लँडस्केप कॅमेरा दिला आहे. आयपॅड एअरमध्ये एम2 चिपसेट देण्यात आला आहे. याची सुरुवातीची किमत ही 15 मे पासून 59,900 रुपये राहणार आहे.
आयफोन 15 सीरीज 8 महिन्यांपूर्वी ‘वंडरलस्ट इव्हेंट’मध्ये लॉन्च
याआधी, सुमारे 8 महिन्यांपूर्वी, कंपनीने 12 सप्टेंबर रोजी आपल्या ‘वंडरलस्ट इव्हेंट’मध्ये आयफोन 15 सीरीज, वॉच सीरीज 9 आणि वॉच अल्ट्रा 2 लॉन्च केले होते. प्रत्येक इव्हेंटमध्ये काहीतरी वेगळे देण्याच्या प्रयत्नात अॅपलने प्रथमच चार्जिंगसाठी टाइप-सी पोर्ट सादर केले. पूर्वी लाइटनिंग पोर्ट उपलब्ध होते. अॅपलने आयफोन 15 मालिका भारतीय बाजारात 79,990 च्या सुरुवातीच्या
Home महत्वाची बातमी ‘लेट लूज’मध्ये अॅपलचा सर्वात लहान आयपॅड लाँच
‘लेट लूज’मध्ये अॅपलचा सर्वात लहान आयपॅड लाँच
आयपॅड एअर, मॅझिक किबोर्डसह पेन्सिल प्रोचेही लाँचिंग दिल्ली : तंत्रज्ञान क्षेत्रातील जगातील दिग्गज कंपनी अॅपलने आपला ‘लेट लूज’ हा इव्हेंट नुकताच सादर केला आहे. या कार्यक्रमात कंपनीने आयपॅड एअर, मॅझिक किबोर्ड आणि पेन्सिल प्रो, आयपॅड एअर आणि आयपॅड प्रो 11 इंच व 13 इंच या आकारातील डिस्प्लेंसह हे आयपॅड सादर करण्यात आले आहेत. 11 इंच […]