कुलाब्यातील ताजमध्ये पुरस्कार सोहळ्यादरम्यान ॲपल आयफोन चोरीला

मुंबईच्या (mumbai) कुलाब्यातील ताजमध्ये पुरस्कार सोहळ्यादरम्यान ॲपल आयफोन 12  (Apple iphone 12) चोरीला गेल्याची धक्कादायक घटना घडली. कंपनीच्या संचालकाने या प्रकरणाची तक्रार दाखल केली. सुरुची आठवले या कंपनीच्या संचालकांपैकी एक आहेत. कार्यक्रम संपल्यानंतर, सुरुची आठवले हॉटेलमधून बाहेर पडल्या आणि पर्समधला फोन घेण्यासाठी फोन शोधू लागल्या जेणेकरून त्या त्यांच्या ड्रायव्हरला बोलावू शकतील. तेव्हा त्यांना फोन चोरीला गेल्याचे कळाले. त्या ठाण्यातील (Thane) नौपाडा येथील रहिवासी आहेत. नुकतंच मुंबईच्या कुलाबा (colaba) येथील द ताज येथे एका पुरस्कार सोहळ्यादरम्यान एका खाजगी कंपनीच्या संचालकाचा आयफोन 12 मोबाईल चोरीला गेला. सुरुची आठवले (52) यांनी कुलाबा पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या तक नुसार, मेयर ऑरगॅनिक्स प्रायव्हेट लिमिटेड या तिच्या कंपनीच्या क्रिस्टल रूममध्ये पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. मात्र, त्यांचा फोन काही सापडला नाही.  त्या आपल्या फोन शोधण्यासाठी हॉटेलमध्ये परत गेल्या, पण त्याचा काहीच फायदा झाला नाही. नंतर द ताजच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांना एका अज्ञात व्यक्तीने पर्स मधून मोबाईल काढतानाचा सीसीटीव्ही फुटेज दाखवला. सर्व कर्मचारी पुरस्कार सोहळ्यात व्यस्त असताना अज्ञात व्यक्तीने परिस्थितीचा फायदा घेत सुमारे 70 हजार रुपये किंमतीचा आयफोन चोरून नेला. सुरुची आठवले यांनी या चोरीच्या प्रकरणाची पोलिस ठाण्यात तक्रार केली आहे. तसेच पोलिस ॲपल आयफोन 12 चोरलेल्या संबंधित अज्ञात व्यक्तीचा शोध घेत आहे.हेही वाचागोरेगावमध्ये तरूणाने घेतला गळफास, पोलिसांचा तपास सुरू वायू प्रदूषण कमी करण्यासाठी केलेल्या कारवाईचा तपशील द्या : हायकोर्ट

कुलाब्यातील ताजमध्ये पुरस्कार सोहळ्यादरम्यान ॲपल आयफोन चोरीला

मुंबईच्या (mumbai) कुलाब्यातील ताजमध्ये पुरस्कार सोहळ्यादरम्यान ॲपल आयफोन 12  (Apple iphone 12) चोरीला गेल्याची धक्कादायक घटना घडली. कंपनीच्या संचालकाने या प्रकरणाची तक्रार दाखल केली. सुरुची आठवले या कंपनीच्या संचालकांपैकी एक आहेत. कार्यक्रम संपल्यानंतर, सुरुची आठवले हॉटेलमधून बाहेर पडल्या आणि पर्समधला फोन घेण्यासाठी फोन शोधू लागल्या जेणेकरून त्या त्यांच्या ड्रायव्हरला बोलावू शकतील. तेव्हा त्यांना फोन चोरीला गेल्याचे कळाले. त्या ठाण्यातील (Thane) नौपाडा येथील रहिवासी आहेत.नुकतंच मुंबईच्या कुलाबा (colaba) येथील द ताज येथे एका पुरस्कार सोहळ्यादरम्यान एका खाजगी कंपनीच्या संचालकाचा आयफोन 12 मोबाईल चोरीला गेला. सुरुची आठवले (52) यांनी कुलाबा पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या तक नुसार, मेयर ऑरगॅनिक्स प्रायव्हेट लिमिटेड या तिच्या कंपनीच्या क्रिस्टल रूममध्ये पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.मात्र, त्यांचा फोन काही सापडला नाही.  त्या आपल्या फोन शोधण्यासाठी हॉटेलमध्ये परत गेल्या, पण त्याचा काहीच फायदा झाला नाही. नंतर द ताजच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांना एका अज्ञात व्यक्तीने पर्स मधून मोबाईल काढतानाचा सीसीटीव्ही फुटेज दाखवला. सर्व कर्मचारी पुरस्कार सोहळ्यात व्यस्त असताना अज्ञात व्यक्तीने परिस्थितीचा फायदा घेत सुमारे 70 हजार रुपये किंमतीचा आयफोन चोरून नेला.सुरुची आठवले यांनी या चोरीच्या प्रकरणाची पोलिस ठाण्यात तक्रार केली आहे. तसेच पोलिस ॲपल आयफोन 12 चोरलेल्या संबंधित अज्ञात व्यक्तीचा शोध घेत आहे.हेही वाचागोरेगावमध्ये तरूणाने घेतला गळफास, पोलिसांचा तपास सुरूवायू प्रदूषण कमी करण्यासाठी केलेल्या कारवाईचा तपशील द्या : हायकोर्ट

Go to Source