अन्…बसथांब्याला तळ्याचे स्वरूप
धर्मवीर संभाजी चौकातील प्रकार, प्रवाशांची गैरसोय
बेळगाव : मागील आठ दिवसांपासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे शहर परिसरात विविध ठिकाणी पाणी साचू लागले आहे. धर्मवीर संभाजी चौक येथील बसथांब्यासमोर पाणी साचून तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. शिवाय या पावसाने प्रशासनाच्या कारभाराचे तीनतेरा वाजवले आहेत. शहरात स्मार्ट सिटीअंतर्गत बांधण्यात आलेल्या स्मार्ट बसथांब्यांसमोर पावसाचे पाणी साचत असल्याने पादचाऱ्यांची गैरसोय होऊ लागली आहे. काही बसथांब्यांना गळती लागल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. रस्त्यावरच पाणी साचत असल्याने ये-जा करणे कठीण होत आहे. धर्मवीर संभाजी चौक येथे शेकडो प्रवाशांची वर्दळ असते. शिवाय अनगोळ, वडगाव, मजगाव, संतिबस्तवाड यासह खानापूर भागात जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होऊ लागली आहे. विशेषत: शहराच्या प्रवेशद्वारावरच तळे साचत असल्याने सौंदर्यालाही बाधा येत आहे. धर्मवीर संभाजी चौकात संभाजी महाराजांची मूर्ती आहे. मात्र परिसरातच पावसाचे पाणी साचत असल्याने शिवभक्तांतून नाराजी व्यक्त होत आहे. एकीकडे प्रशासन पाणी साठवून ठेवू नये, असे आवाहन करत आहे. तर दुसरीकडे प्रशासनाच्या गलथान कारभारामुळेच पाणी साचून राहत आहे. या प्रकाराबाबत संताप व्यक्त होत आहे.
Home महत्वाची बातमी अन्…बसथांब्याला तळ्याचे स्वरूप
अन्…बसथांब्याला तळ्याचे स्वरूप
धर्मवीर संभाजी चौकातील प्रकार, प्रवाशांची गैरसोय बेळगाव : मागील आठ दिवसांपासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे शहर परिसरात विविध ठिकाणी पाणी साचू लागले आहे. धर्मवीर संभाजी चौक येथील बसथांब्यासमोर पाणी साचून तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. शिवाय या पावसाने प्रशासनाच्या कारभाराचे तीनतेरा वाजवले आहेत. शहरात स्मार्ट सिटीअंतर्गत बांधण्यात आलेल्या स्मार्ट बसथांब्यांसमोर पावसाचे पाणी […]