मिरज-मंगळूर महालक्ष्मी एक्स्प्रेससाठी खासदारांकडे साकडे

कर्नाटकातील व्यापारी सांगली येथील खासदारांच्या भेटीला बेळगाव : पर्यटनासोबत व्यापार, शिक्षण, उद्योगासाठी महत्त्वाची असणारी मिरज-मंगळूर महालक्ष्मी एक्स्प्रेस पूर्ववत करण्यासाठी सांगलीच्या खासदारांकडे साकडे घालण्यात आले. एक्स्प्रेस सुरू झाल्यास सांगली, कोल्हापूर, बेळगाव यासह परिसरातील जिल्ह्यांची सोय होणार आहे. केरळ व कर्नाटकातील व्यापारी संघटनांनी सांगलीचे खासदार विशाल पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे. सांगली-बेळगावहून मंगळूरला जाण्यासाठी थेट रेल्वे उपलब्ध नाही. यामुळे या परिसरातील […]

मिरज-मंगळूर महालक्ष्मी एक्स्प्रेससाठी खासदारांकडे साकडे

कर्नाटकातील व्यापारी सांगली येथील खासदारांच्या भेटीला
बेळगाव : पर्यटनासोबत व्यापार, शिक्षण, उद्योगासाठी महत्त्वाची असणारी मिरज-मंगळूर महालक्ष्मी एक्स्प्रेस पूर्ववत करण्यासाठी सांगलीच्या खासदारांकडे साकडे घालण्यात आले. एक्स्प्रेस सुरू झाल्यास सांगली, कोल्हापूर, बेळगाव यासह परिसरातील जिल्ह्यांची सोय होणार आहे. केरळ व कर्नाटकातील व्यापारी संघटनांनी सांगलीचे खासदार विशाल पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
सांगली-बेळगावहून मंगळूरला जाण्यासाठी थेट रेल्वे उपलब्ध नाही. यामुळे या परिसरातील नागरिकांना हुबळी गाठून तेथून मंगळूरपर्यंतचा प्रवास करावा लागत आहे. यापूर्वी मिरज-मंगळूर या मार्गावर महालक्ष्मी एक्स्प्रेस सुरू होती. कोकण किनारपट्टीला घाटमाथ्याला जोडण्यासाठी एक्स्प्रेस महत्त्वाची होती. मंगळूर येथे अनेक नामवंत शिक्षण संस्था असल्यामुळे विद्यार्थी उच्च शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांना ये-जा करण्यासाठी महालक्ष्मी एक्स्प्रेस पूर्ववत करण्याची मागणी केली जात आहे.
मिरज ते मंगळूर महालक्ष्मी एक्स्प्रेस दररोज सुरू करावी, त्याचबरोबर मंगळूर, मडगाव, लोंढा, बेळगाव, मिरज, सातारा मार्गे धावणारी पूर्णा एक्स्प्रेस आठवड्यातून किमान तीनवेळा सुरू करण्याची मागणी करण्यात आली. सांगलीच्या नागरिक जागृती मंचचे अध्यक्ष सतीश साखळकर यांच्याशीही कर्नाटकातील व्यापाऱ्यांनी चर्चा केली.