मोफत वीज-पाण्यासाठी शाळांना माहिती देण्याचे आवाहन

उद्यापर्यंत मुदत बेळगाव : राज्य सरकारकडून सरकारी शाळांना मोफत वीज व पाणीपुरवठा केला जाणार आहे. परंतु अनेक शाळांनी आपली माहिती सार्वजनिक शिक्षण विभागाला दिली नसल्याने योजनेचा लाभ देण्यामध्ये अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे दि. 25 जानेवारीपूर्वी शाळांची संपूर्ण माहिती न दिल्यास शाळा व्यवस्थापनाला वीज व पाणीपुरवठ्याचा खर्च करावा लागणार असल्याचा इशारा शिक्षण विभागाने दिला आहे. […]

मोफत वीज-पाण्यासाठी शाळांना माहिती देण्याचे आवाहन

उद्यापर्यंत मुदत
बेळगाव : राज्य सरकारकडून सरकारी शाळांना मोफत वीज व पाणीपुरवठा केला जाणार आहे. परंतु अनेक शाळांनी आपली माहिती सार्वजनिक शिक्षण विभागाला दिली नसल्याने योजनेचा लाभ देण्यामध्ये अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे दि. 25 जानेवारीपूर्वी शाळांची संपूर्ण माहिती न दिल्यास शाळा व्यवस्थापनाला वीज व पाणीपुरवठ्याचा खर्च करावा लागणार असल्याचा इशारा शिक्षण विभागाने दिला आहे. पूर्वी सरकारी शाळांमधील विद्युत व पाणीपुरवठ्याचे बिल शाळा व्यवस्थापन समितीमार्फत भरले जात होते. सिद्धरामय्या सरकारने शाळांना मोफत वीज व पाणीपुरवठा देण्याची योजना जाहीर केली. यासाठी 20 डिसेंबर 2023 पर्यंत शाळांची माहिती मागविण्यात आली होती. परंतु केवळ सात शैक्षणिक जिल्ह्यांतील शाळांमधील माहिती देण्यात आली. उर्वरित 28 शैक्षणिक जिल्ह्यांतील माहिती अपूर्ण होती. यामुळे योजनेचा लाभ मिळवून देताना अडथळे येत होते. राज्य सरकारने सरकारी शाळांना 25 जानेवारीपर्यंत माहिती देण्याचे आवाहन केले आहे. त्यापूर्वी माहिती न दिल्यास या योजनेचा लाभ संबंधित शाळांना मिळणार नाही. त्यामुळे त्या शाळांना स्वखर्चातूनच विद्युत व पाण्याचे बिल भरावे लागणार आहे.