व्यवसाय परवाना नूतनीकरणासाठी आवाहन
6,832 व्यावसायिकांचे नूतनीकरणाकडे दुर्लक्ष
बेळगाव : शहरातील व्यावसायिकांनी आपल्या व्यवसाय परवान्यांचे नूतनीकरण करण्याकडे दुर्लक्ष केले आहे. मार्चअखेरपर्यंत नूतनीकरण करणे गरजेचे आहे. मात्र अजूनही 6 हजार 832 व्यावसायिकांनी परवान्यांचे नूतनीकरण केले नाही. तेव्हा तातडीने नूतनीकरण करावे, असे आवाहन महानगरपालिकेच्यावतीने करण्यात आले आहे. एप्रिल 2023 पासून आतापर्यंत 713 नवीन व्यावसायिकांनी परवाने घेतले आहेत. तर 2 हजार 456 व्यावसायिकांनी आपल्या परवान्यांचे नूतनीकरण केले आहे. मुदत संपलेल्या 6 हजार 832 जणांनी अजूनही नूतनीकरण केले नाही. नूतनीकरणासाठी केवळ दोन महिनेच अवधी उरला आहे. तोपर्यंत नूतनीकरण करावे, अन्यथा दंड आकारला जाणार आहे, अशी माहिती महानगरपालिकेने दिली आहे. शहरामध्ये कोणताही व्यवसाय थाटायचा असेल तर महानगरपालिकेकडून रितसर परवाना घेणे बंधनकारक आहे. मात्र बरेचजण परवाना न घेताच व्यवसाय करत असल्याचे प्रकार वारंवार उघडकीस आले आहेत. अनेकवेळा त्यांच्याकडून दंड वसूल केला जात आहे. तरीदेखील परवाना घेणे, तसेच नूतनीकरण करण्याकडे दुर्लक्ष होत आहे. व्यवसाय करण्यासाठी महानगरपालिकेकडून 1 वर्ष ते 5 वर्षांपर्यंत परवाना दिला जातो. बरेचजण एक वर्षाचा परवाना घेतात. मात्र त्यानंतर नूतनीकरण करत नाहीत. 10 हजारांहून अधिक व्यावसायिकांनी परवाना घेतला नाही, तसेच नूतनीकरणही केले नाही. अनेकवेळा संबंधितांना नोटीस बजावूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. तेव्हा तातडीने मार्चअखेरपर्यंत परवाना नूतनीकरण, तसेच परवाना घ्यावा, अन्यथा दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा महानगरपालिकेने दिला आहे.
Home महत्वाची बातमी व्यवसाय परवाना नूतनीकरणासाठी आवाहन
व्यवसाय परवाना नूतनीकरणासाठी आवाहन
6,832 व्यावसायिकांचे नूतनीकरणाकडे दुर्लक्ष बेळगाव : शहरातील व्यावसायिकांनी आपल्या व्यवसाय परवान्यांचे नूतनीकरण करण्याकडे दुर्लक्ष केले आहे. मार्चअखेरपर्यंत नूतनीकरण करणे गरजेचे आहे. मात्र अजूनही 6 हजार 832 व्यावसायिकांनी परवान्यांचे नूतनीकरण केले नाही. तेव्हा तातडीने नूतनीकरण करावे, असे आवाहन महानगरपालिकेच्यावतीने करण्यात आले आहे. एप्रिल 2023 पासून आतापर्यंत 713 नवीन व्यावसायिकांनी परवाने घेतले आहेत. तर 2 हजार 456 […]