आप्पाचीवाडी ग्रामस्थांचे मंगेश चिवटे यांना निवेदन

वैद्यकीय साहाय्यता निधीत सामावून घेण्याचे आश्वासन बेळगाव : संपूर्ण मराठी भाषिक असलेल्या आप्पाचीवाडी (ता. निपाणी) या गावाला महाराष्ट्र मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता निधीतून वगळण्यात आल्याने तेथील ग्रामस्थ शनिवारी बेळगावत दाखल झाले. त्यांनी मराठा मंगल कार्यालय येथे उपस्थित असलेले मुख्यमंत्री साहाय्यता निधी कक्ष प्रमुख व मुख्यमंत्री विशेष अधिकारी मंगेश चिवटे यांची भेट घेऊन आपल्या गावाचाही त्यामध्ये समावेश करावा, अशी मागणी केली आहे. […]

आप्पाचीवाडी ग्रामस्थांचे मंगेश चिवटे यांना निवेदन

वैद्यकीय साहाय्यता निधीत सामावून घेण्याचे आश्वासन
बेळगाव : संपूर्ण मराठी भाषिक असलेल्या आप्पाचीवाडी (ता. निपाणी) या गावाला महाराष्ट्र मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता निधीतून वगळण्यात आल्याने तेथील ग्रामस्थ शनिवारी बेळगावत दाखल झाले. त्यांनी मराठा मंगल कार्यालय येथे उपस्थित असलेले मुख्यमंत्री साहाय्यता निधी कक्ष प्रमुख व मुख्यमंत्री विशेष अधिकारी मंगेश चिवटे यांची भेट घेऊन आपल्या गावाचाही त्यामध्ये समावेश करावा, अशी मागणी केली आहे. तेथील ग्रामस्थांनी मंगेश चिवटे यांना निवेदन दिले. आम्हाला या योजनेतून वगळण्यात आले आहे असे सांगत आम्हाला या योजनेचा लाभ मिळावा यासाठी प्रयत्न करावे, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी मंगेश चिवटे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नजरेला ही बाब निश्चितच आणून दिली जाईल. लवकरच संपूर्ण मराठी भाषिक असलेले हे गाव या योजनेत दाखल केले जाईल, असे आश्वासन दिले.