अपाचे हेलिकॉप्टरला लडाखमध्ये अपघात

पायलट सुरक्षित : प्रशिक्षणादरम्यान इमर्जन्सी लँडिंग वृत्तसंस्था /श्रीनगर भारतीय हवाई दलाच्या अपाचे हेलिकॉप्टरचे लडाखमध्ये आपत्कालीन लँडिंग केल्यामुळे नुकसान झाले आहे. हेलिकॉप्टरमधील संभाव्य तांत्रिक बिघाडामुळे ही घटना घडल्याची माहिती हवाई दलाने दिली. सुदैवाने हेलिकॉप्टरमधील दोन्ही पायलट सुरक्षित आहेत. भारतीय वायुसेनेने या घटनेसंदर्भात एक निवेदन जारी केले आहे. लडाखमध्ये ऑपरेशनल टेनिंग दरम्यान अपाचे हेलिकॉप्टरचे 3 एप्रिल रोजी […]

अपाचे हेलिकॉप्टरला लडाखमध्ये अपघात

पायलट सुरक्षित : प्रशिक्षणादरम्यान इमर्जन्सी लँडिंग
वृत्तसंस्था /श्रीनगर
भारतीय हवाई दलाच्या अपाचे हेलिकॉप्टरचे लडाखमध्ये आपत्कालीन लँडिंग केल्यामुळे नुकसान झाले आहे. हेलिकॉप्टरमधील संभाव्य तांत्रिक बिघाडामुळे ही घटना घडल्याची माहिती हवाई दलाने दिली. सुदैवाने हेलिकॉप्टरमधील दोन्ही पायलट सुरक्षित आहेत. भारतीय वायुसेनेने या घटनेसंदर्भात एक निवेदन जारी केले आहे. लडाखमध्ये ऑपरेशनल टेनिंग दरम्यान अपाचे हेलिकॉप्टरचे 3 एप्रिल रोजी आपत्कालीन लँडिंग करण्यात आल्याचे स्पष्ट करतानाच अस्ताव्यस्त भूभाग आणि उच्च उंचीमुळे हेलिकॉप्टरचे नुकसान झाल्याचा दावा त्यात करण्यात आला आहे. अपघातानंतर अपाचे हेलिकॉप्टरमधील दोन्ही वैमानिकांना जवळच्या एअरबेसवर नेण्यात आले आहे. या दुर्घटनेची कारणे शोधण्यासाठी कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे आदेश देण्यात आले आहेत.