भारताच्या विजयात अनुक्षाची हॅट्ट्रिक
वृत्तसंस्था/ काठमांडू
16 वर्षाखालील वयोगटाच्या येथे सुरू असलेल्या महिलांच्या सॅफ चॅम्पियनशिप फुटबॉल स्पर्धेत भारतीय महिला फुटबॉल संघाने भूतानचा 7-0 अशा गोलफरकाने एकतर्फी पराभव केला. या सामन्यात भारतीय संघातील अनुक्षा कुमारीने शानदार हॅट्ट्रिक नोंदवली.
हझारीबागच्या 13 वर्षीय अनुक्षा कुमारीने उपकनिष्ठ टायर-1 स्पर्धेत आतापर्यंत दर्जेदार कामगिरी करताना 22 गोल नोंदवले आहेत. भूतानविरुद्धच्या सामन्यात तिने तीन गोल केले. भारतातर्फे पर्ल फर्नांडिसने 2 गोल तर श्वेता राणी आणि बदली खेळाडू अन्वीता रघुरामन यांनी प्रत्येकी एक गोल केला. या सामन्यात भारताने 14 मिनिटांच्या कालावधीत 4 गोल नोंदवले. या स्पर्धेत चार संघांचा समावेश आहे. यजमान नेपाळ आणि बांगलादेश हे या स्पर्धेत आघाडीवर असून त्यांच्यात 10 मार्च रोजी अंतिम सामना खेळवला जाईल.
Home महत्वाची बातमी भारताच्या विजयात अनुक्षाची हॅट्ट्रिक
भारताच्या विजयात अनुक्षाची हॅट्ट्रिक
वृत्तसंस्था/ काठमांडू 16 वर्षाखालील वयोगटाच्या येथे सुरू असलेल्या महिलांच्या सॅफ चॅम्पियनशिप फुटबॉल स्पर्धेत भारतीय महिला फुटबॉल संघाने भूतानचा 7-0 अशा गोलफरकाने एकतर्फी पराभव केला. या सामन्यात भारतीय संघातील अनुक्षा कुमारीने शानदार हॅट्ट्रिक नोंदवली. हझारीबागच्या 13 वर्षीय अनुक्षा कुमारीने उपकनिष्ठ टायर-1 स्पर्धेत आतापर्यंत दर्जेदार कामगिरी करताना 22 गोल नोंदवले आहेत. भूतानविरुद्धच्या सामन्यात तिने तीन गोल केले. […]