शहरात मंगळवारी पुन्हा प्लास्टिकविरोधी मोहीम
मनपा अधिकाऱ्यांनी 22 हजार रुपयांचा दंड केला वसूल
बेळगाव : प्लास्टिक विरोधात महानगरपालिकेने पुन्हा मोहीम तीव्र केली आहे. मंगळवारी गणपत गल्ली परिसरातील विविध दुकानांमध्ये धाडी घालून प्लास्टिक जप्त करण्यात आले. तसेच 22 हजार रुपये दंड आकारण्यात आला आहे. यामुळे व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली असून प्लास्टिकला पर्याय उपलब्ध करूनच कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. केंद्र सरकारने पर्यावरण जपण्यासाठी प्लास्टिक वापरावर बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. याबाबत महानगरपालिकेला सूचना करण्यात आली आहे. त्यानुसार महानगरपालिकेचे आरोग्य व पर्यावरण विभागातील कर्मचारी, अधिकारी शहरामध्ये प्लास्टिकचा वापर करणाऱ्या आस्थापनांवर धाडी घालत आहेत. यापूर्वीही जवळपास 200 किलोहून अधिक प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे. मंगळवारी गणपत गल्ली, रविवार पेठ परिसरात प्लास्टिक वापरणाऱ्या दुकानांच्या ठिकाणी तपासणी करण्यात आली. त्या दुकानदारांकडून 22 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. महानगरपालिकेचे आयुक्त अशोक दुडगुंटी यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य अधिकारी डॉ. संजीव नांद्रे यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली आहे.
Home महत्वाची बातमी शहरात मंगळवारी पुन्हा प्लास्टिकविरोधी मोहीम
शहरात मंगळवारी पुन्हा प्लास्टिकविरोधी मोहीम
मनपा अधिकाऱ्यांनी 22 हजार रुपयांचा दंड केला वसूल बेळगाव : प्लास्टिक विरोधात महानगरपालिकेने पुन्हा मोहीम तीव्र केली आहे. मंगळवारी गणपत गल्ली परिसरातील विविध दुकानांमध्ये धाडी घालून प्लास्टिक जप्त करण्यात आले. तसेच 22 हजार रुपये दंड आकारण्यात आला आहे. यामुळे व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली असून प्लास्टिकला पर्याय उपलब्ध करूनच कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. केंद्र सरकारने पर्यावरण जपण्यासाठी प्लास्टिक वापरावर बंदी घालण्याचे […]