मुंबई : रेबीजमुळे आणखी एका कोल्ह्याचा मृत्यू,
मुंबईत (mumbai) सोनेरी कोल्ह्यांच्या (fox) मृत्यूच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. दोन दिवसांपूर्वी एका कोल्ह्याचा मृत्यू (death) झाला होता. तसेच चेंबूरजवळ सोनेरी कोल्ह्याचा मृतदेह सापडला होता. हा मृत्यू रेबिजमुळे झाले असल्याचे स्पष्ट झाले होते. मुंबईत रेबीजच्या संसर्गामुळे वन्य प्राण्यांच्या मृत्यूची ही तिसरी घटना आहे.चेंबूर (chembur) परिसरात गेल्या दोन महिन्यांत दोन सोनेरी कोल्ह्यांचा रेबीजमुळे मृत्यू झाला आहे. त्यानंतर गुरुवारी याच परिसरात आणखी एका सोनेरी कोल्ह्याचा मृतदेह आढळून आला. याआधी दोन कोल्ह्यांचे मृत्यू रेबीजमुळे झाले होते. त्यामुळे तज्ज्ञांनी या मृत कोल्ह्याचे नमुने देखील रेबीजच्या (rabies) तपासणीसाठी पाठवले होते. रेबीज चाचणी अहवालात मृत सोनेरी कोल्ह्याला रेबीज झाल्याचे स्पष्ट झाले. तिसऱ्या कोल्ह्याचा मृत्यूही रेबीजमुळे झाल्याचे अहवालावरून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे मुंबईत रेबीजच्या संसर्गाने वन्य प्राण्याचा मृत्यू होण्याची ही तिसरी घटना आहे.दरम्यान, वनविभागाने भाभा अणुऊर्जा संशोधन केंद्र (बीएआरसी) आणि आसपासच्या परिसराचे मॅपिंग सुरू केले आहे. सोनेरी कोल्ह्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी कॅमेरा ट्रॅपिंगही सुरू केले आहे.वन्य प्राण्यांच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी ठाणे वनसंरक्षक अक्षय गजभिये यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. वनविभागाने चेंबूर परिसरात जनजागृती मोहीम सुरू केली आहे.याआधी ऑक्टोबरमध्ये एका सोनेरी कोल्ह्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. डॉक्टरांना संशय आल्याने मृत कोल्ह्याच्या मेंदूचे नमुने मुंबईतील पशुवैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आले होते. चाचणी अहवालानुसार कोल्ह्याला रेबीज झाल्याचे निष्पन्न झाले. मुंबईत रेबीजमुळे वन्य प्राण्याचा मृत्यू झाल्याची ही पहिलीच घटना आहे. त्यानंतर नोव्हेंबर महिन्याच्या मध्यावर भाभा अणुऊर्जा संशोधन केंद्राच्या परिसरात एक जखमी कोल्हा आढळून आला होता. कोल्ह्याला उपचारासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात दाखल करण्यात आले होते. त्याच्या एकूण हालचालींवरून त्याला रेबीजची लागण होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली. तसेच या कोल्ह्याने परिसरातील एका लहान मुलावर हल्ला केला. या कोल्ह्यालाही रेबीज झाल्याचे आढळून आले. हेही वाचा31 जिल्ह्यांमधील 104 उमेदवारांची EVM-VVPAT पडताळणीची मागणीधारावी रहिवाशांची आरोग्य विम्यासाठी नोंदणी
Home महत्वाची बातमी मुंबई : रेबीजमुळे आणखी एका कोल्ह्याचा मृत्यू,
मुंबई : रेबीजमुळे आणखी एका कोल्ह्याचा मृत्यू,
मुंबईत (mumbai) सोनेरी कोल्ह्यांच्या (fox) मृत्यूच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. दोन दिवसांपूर्वी एका कोल्ह्याचा मृत्यू (death) झाला होता. तसेच चेंबूरजवळ सोनेरी कोल्ह्याचा मृतदेह सापडला होता. हा मृत्यू रेबिजमुळे झाले असल्याचे स्पष्ट झाले होते. मुंबईत रेबीजच्या संसर्गामुळे वन्य प्राण्यांच्या मृत्यूची ही तिसरी घटना आहे.
चेंबूर (chembur) परिसरात गेल्या दोन महिन्यांत दोन सोनेरी कोल्ह्यांचा रेबीजमुळे मृत्यू झाला आहे. त्यानंतर गुरुवारी याच परिसरात आणखी एका सोनेरी कोल्ह्याचा मृतदेह आढळून आला. याआधी दोन कोल्ह्यांचे मृत्यू रेबीजमुळे झाले होते. त्यामुळे तज्ज्ञांनी या मृत कोल्ह्याचे नमुने देखील रेबीजच्या (rabies) तपासणीसाठी पाठवले होते.
रेबीज चाचणी अहवालात मृत सोनेरी कोल्ह्याला रेबीज झाल्याचे स्पष्ट झाले. तिसऱ्या कोल्ह्याचा मृत्यूही रेबीजमुळे झाल्याचे अहवालावरून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे मुंबईत रेबीजच्या संसर्गाने वन्य प्राण्याचा मृत्यू होण्याची ही तिसरी घटना आहे.
दरम्यान, वनविभागाने भाभा अणुऊर्जा संशोधन केंद्र (बीएआरसी) आणि आसपासच्या परिसराचे मॅपिंग सुरू केले आहे. सोनेरी कोल्ह्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी कॅमेरा ट्रॅपिंगही सुरू केले आहे.
वन्य प्राण्यांच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी ठाणे वनसंरक्षक अक्षय गजभिये यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. वनविभागाने चेंबूर परिसरात जनजागृती मोहीम सुरू केली आहे.
याआधी ऑक्टोबरमध्ये एका सोनेरी कोल्ह्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. डॉक्टरांना संशय आल्याने मृत कोल्ह्याच्या मेंदूचे नमुने मुंबईतील पशुवैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आले होते. चाचणी अहवालानुसार कोल्ह्याला रेबीज झाल्याचे निष्पन्न झाले.
मुंबईत रेबीजमुळे वन्य प्राण्याचा मृत्यू झाल्याची ही पहिलीच घटना आहे. त्यानंतर नोव्हेंबर महिन्याच्या मध्यावर भाभा अणुऊर्जा संशोधन केंद्राच्या परिसरात एक जखमी कोल्हा आढळून आला होता.
कोल्ह्याला उपचारासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात दाखल करण्यात आले होते. त्याच्या एकूण हालचालींवरून त्याला रेबीजची लागण होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली. तसेच या कोल्ह्याने परिसरातील एका लहान मुलावर हल्ला केला. या कोल्ह्यालाही रेबीज झाल्याचे आढळून आले. हेही वाचा
31 जिल्ह्यांमधील 104 उमेदवारांची EVM-VVPAT पडताळणीची मागणी
धारावी रहिवाशांची आरोग्य विम्यासाठी नोंदणी