पुन्हा भाजपप्रणित ‘रालोआ’लाच संधी

इंडिया’ला 125 ते 161 जागा मिळण्याचा अंदाज, मध्यप्रदेश, राजस्थानमध्ये भाजपचा एकतर्फी विजय वृत्तसंस्था/ नवी दिल्ली लोकसभा निवडणुकीच्या सातही टप्प्यातील मतदान संपले असून 4 जून रोजी निकाल लागणार आहेत. तत्पूर्वी शनिवारी अंतिम टप्प्यातील मतदानानंतर विविध वृत्तवाहिन्या आणि संस्थांचे एक्झिट पोल अंदाज जाहीर करण्यात आले. जवळपास दहा एक्झिट पोलनी भाजपप्रणित रालोआ 350 पेक्षा जास्त जागा मिळतील असा होरा […]

पुन्हा भाजपप्रणित ‘रालोआ’लाच संधी

इंडिया’ला 125 ते 161 जागा मिळण्याचा अंदाज, मध्यप्रदेश, राजस्थानमध्ये भाजपचा एकतर्फी विजय
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
लोकसभा निवडणुकीच्या सातही टप्प्यातील मतदान संपले असून 4 जून रोजी निकाल लागणार आहेत. तत्पूर्वी शनिवारी अंतिम टप्प्यातील मतदानानंतर विविध वृत्तवाहिन्या आणि संस्थांचे एक्झिट पोल अंदाज जाहीर करण्यात आले. जवळपास दहा एक्झिट पोलनी भाजपप्रणित रालोआ 350 पेक्षा जास्त जागा मिळतील असा होरा व्यक्त केला. तर, इंडिया आघाडीला 125 ते 161 जागा मिळण्याची शक्मयता आहे. हा मतदानोत्तर अंदाज असला तरी प्रत्यक्ष निकालासाठी जनतेला मंगळवारी होणाऱ्या मतमोजणीची प्रतिक्षा करावी लागणार आहे.
लोकसभेच्या 542 जागांपैकी सहाव्या टप्प्यापर्यंत 485 जागांवर मतदान झाले होते. शेवटच्या 57 जागांसाठी 1 जून रोजी मतदान पार पडले. गुजरातमध्ये भाजपचे उमेदवार मुकेश दलाल सुरतमधून बिनविरोध निवडणूक जिंकल्यामुळे केवळ 542 जागांवर मतदान प्रक्रिया पार पडली. मतदान प्रक्रिया पूर्ण होताच जाहीर झालेल्या एक्झिट पोलनुसार, महाराष्ट्रात निकराची स्पर्धा पाहायला मिळत आहे. एबीपीच्या एक्झिट पोलमध्ये एनडीएला 22 ते 26 जागा आणि ‘इंडिया’ आघाडीला 23 ते 25 जागा देण्यात आल्या आहेत. गोव्यात भाजप आणि काँग्रेसला प्रत्येकी 1-1 जागा मिळताना दिसत आहे. ‘आज तक’च्या एक्झिट पोलमध्ये दोघांमध्ये चुरशीची लढत दिसून आली. तसेच कर्नाटकात भाजपप्रणित एनडीएला मोठी आघाडी मिळेल असे दाखविण्यात आले आहे. कर्नाटकातील एकूण 28 जागांपैकी भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला 22 तर ‘इंडिया’ आघाडीला 5 जागा मिळू शकतात. राज्यात काँग्रेसची सत्ता असली तरी लोकसभा निवडणुकीत मात्र जनतेने भाजपच्या बाजूने कौल टाकल्याचे दिसत आहे.
उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगढ आणि दिल्ली या हिंदीभाषिक राज्यांमध्ये भाजपला एकतर्फी आघाडी मिळण्याचा अंदाज आहे. तसेच गुजरातमध्ये भाजपला सर्व 26 जागा मिळण्याचा अंदाज आहे. या राज्यांतील 90 टक्क्मयांहून अधिक जागांवर भाजपचा विजय निश्चित मानला जात आहे. मध्यप्रदेशातील 29 जागांपैकी भाजपला 28 ते 29 जागा आणि राजस्थानमध्येही 23 ते 25 जागा मिळण्याची अपेक्षा आहे. उत्तर प्रदेशात 80 पैकी 69 ते 74 जागा आणि छत्तीसगडमध्ये 11 पैकी 11 जागा मिळू शकतात, असे आकडे विविध वाहिन्यांनी जाहीर केले आहेत. दिल्लीतील सर्व जागांवर भाजप विजयी होताना दिसत आहे. भाजपला 6 ते 7 तर ‘इंडिया’ आघाडीला 0 ते 1 जागा मिळतील.
उत्तराखंडमध्ये भाजप क्लीनस्विप करताना दिसत आहे. एक्झिट पोलनुसार भाजप सर्व 5 जागा जिंकू शकते. आसाममध्ये भाजपला 11 जागा मिळण्याची शक्मयता आहे. आज-तकच्या एक्झिट पोलमध्ये भाजपला 9 ते 11 तर ‘इंडिया’ आघाडीला 2 ते 4 जागा देण्यात आल्या आहेत. इंडिया टीव्हीच्या एक्झिट पोलनुसार, एनडीएला 371 ते 400 जागा मिळतील आणि ‘इंडिया’ आघाडीला 109 ते 139 जागा मिळतील असा अंदाज आहे. हिमाचलमधील चारही जागांवर भाजप विजयी होताना दिसत आहे. आज-तकच्या एक्झिट पोलमध्ये भाजपला सर्व जागा जिंकण्याची अपेक्षा आहे.
ओडिशात चमत्कार घडणार?
ओडिशात भाजप चमत्कार करताना दिसत आहे. एबीपीच्या एक्झिट पोलमध्ये भाजपला 17 ते 19 तर नवीन पटनाईक यांच्या पक्ष बीजदला 1 ते 3 जागा मिळताना दिसत आहेत. काँग्रेसला एक जागा मिळण्याची शक्मयता आहे. पंजाबमध्ये भाजपला दोन ते चार जागा मिळण्याची शक्मयता आहे. काँग्रेसला 7 ते 9 तर आम आदमी पार्टीला 0 ते 2 जागा मिळू शकतात. तर अकाली दलाला 1 जागा मिळू शकते. हरियाणात भाजपचे मोठे नुकसान होत आहे. आज-तकच्या आकड्यांनुसार भाजपला 6 तर ‘इंडिया’ आघाडीला 4 जागा मिळाल्याचे दिसत आहे.
दक्षिणेत तुल्यबळ लढत
तेलंगणात निकराची लढत आहे. एबीपीच्या एक्झिट पोलमध्ये एनडीए आणि ‘इंडिया’ आघाडीला 7 ते 9 जागा मिळताना दिसत आहेत. केरळमध्ये ‘इंडिया’ आघाडीला सर्वाधिक जागा मिळताना दिसत आहेत. येथे ‘इंडिया’ आघाडीला 18 तर एनडीएला 2 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर तामिळनाडूमध्ये ‘इंडिया’ आघाडीला 39 पैकी 37 तर एनडीएला 4 जागा दर्शविण्यात आल्या आहेत.
एक्झिट पोल-2024
एकूण जागा –      543 बहुमत   –      272
संस्था                                                       रालोआ                                इंडिया                          अन्य            
भाजप+                            काँग्रेस+
इंडिया न्यूज-पोलस्ट्रैट                                        371                               125                                 47
रिपब्लिक भारत-मैट्रिज                                     361                                 126                               56
रिपब्लिक टीवी                                                  359                                  54                                30
इंडिया न्यूज-डी डायनामिक्स                                 371                                 125                                47
न्यूज नेशन                                                            360                               161                                22
इंडिया टुडे-एक्सिस माय इंडिया                                335                                 166                               42
एबीपी-सी वोटर्स                                                      373                               155                                15
साम-जन की बात                                                    377                                 151                               15
सर्वसाधारण सरासरी                                                    367                              140                                  36