भारतीय फुटबॉल संघाची घोषणा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आगामी होणाऱ्या एएफसी अशिया चषक फुटबॉल स्पर्धेसाठी अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनने रविवारी 26 जणांचा भारतीय संघ जाहीर केल्या. दरम्यान सेहल अब्दुल समदला जखमी असून ही संघात स्थान देण्यात आले आहे. पण मध्यफळीतील जॅक्सनसिंग आणि ग्लेन मार्टीन्स यांना संघात स्थान मिळू शकले नाही.
भारतीय फुटबॉल संघातील मध्यफळीत खेळणारा जॅक्सनला गेल्या नोव्हेंबरमध्ये खांद्याला दुखापत झाली होती. ही दुखापत अद्याप पुर्णपणे बरी झालेली नाही. तसेच मोहन बागान संघातून खेळणारा ग्लेन मार्टिन्स याला तंदरूस्तीच्या समस्येवरून वगळण्यात आले आहे. यापूर्वी या आगामी स्पर्धेसाठी फेडरेशनने 50 संभाव्य फुटबॉल पटूंची निवड केली होती, त्यामध्ये मार्टिन्स जॅक्सन यांचा समावेश होता. अनुभवी सुनील छेत्रीकडे संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे. भारताच्या वरिष्ठ फुटबॉल संघाला इगोर स्टीमॅक यांचे मार्गदर्शन लाभत आहे. भारतीय फुटबॉल संघाने शनिवारी रात्रीच दोहा येथे प्रयाण केले आहे. अशिया चषक फुटबॉल स्पर्धेत भारताने आतापर्यंत पाचवेळा आपला सहभाग दर्शविला आहे. 13 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेत भारताचा ब गटातील सलामीचा सामना ऑस्ट्रेलियाबरोबर होणार आहे. त्यानंतर भारताचा दुसरा सामना उझबेक बरोबर 18 जानेवारीला खेळविला जाईल. या स्पर्धेत भारतीय फुटबॉल संघाचा तिसरा सामना 23 जानेवारीला सिरीयाबरोबर खेळविला जाणार आहे. भारतीय संघाला कतारमध्ये खेळताना तेथील परिस्थितीशी सहजपणे जुळवून घेता येईल. कारण भारताने 2022 च्या फिपा विश्वकरंडक पात्र फेरीच्या फुटबॉल स्पर्धेत 4 सामने खेळले होते. 2011 साली कतारमध्ये झालेल्या एएफसी अशिया चषक फुटबॉल स्पर्धेत सहभागी झालेल्या भारतीय फुटबॉल संघातील सुनील छेत्री आणि गुरप्रितसिंग संधू, यांचा समावेश होता. आगामी स्पर्धेत भारतीय फुटबॉल संघ दर्जेदार कामगिरी करेल. असा विश्वास प्रशिक्षक स्टीमॅक यांनी व्यक्त केला आहे.
भारतीय फुटबॉल संघ ा गोलरक्षक ा अमरींदर सिंग, गुरप्रितसिंग संधु, विशाल कैथ, बचावफळी- आकाश मिश्रा, लालचुंगनुंगा, मेहताब सिंग, निखिल पुजारी, प्रितम कोटल, राहुल भेके, संदेश झिंगन, सुभाषीस बोस, मध्यफळी- अनिरूध्द थापा, बी. फर्नांडीस, दीपक तांग्री, एल. राल्ते, लिस्टन कुलासो, एन. महेशसिंग, सहल अब्दुल समद, सुरेशसिंग वेंगजेम, उदांता सिंग, आघाडी फळी- इशान पंडीता, एल. छांगटे, मनवीरसिंग, राहुल प्रविण, सुनील छेत्री आणि विक्रम प्रतापसिंग.
Home महत्वाची बातमी भारतीय फुटबॉल संघाची घोषणा
भारतीय फुटबॉल संघाची घोषणा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली आगामी होणाऱ्या एएफसी अशिया चषक फुटबॉल स्पर्धेसाठी अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनने रविवारी 26 जणांचा भारतीय संघ जाहीर केल्या. दरम्यान सेहल अब्दुल समदला जखमी असून ही संघात स्थान देण्यात आले आहे. पण मध्यफळीतील जॅक्सनसिंग आणि ग्लेन मार्टीन्स यांना संघात स्थान मिळू शकले नाही. भारतीय फुटबॉल संघातील मध्यफळीत खेळणारा जॅक्सनला गेल्या नोव्हेंबरमध्ये खांद्याला दुखापत […]