सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनच्या वतीने ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना ‘सूर्यदत्त जीवनगौरव पुरस्कार देण्याची घोषणा

सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनच्या वतीने संचालित सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या 28 व्या वर्धापनदिनानिमित्त दिले जाणारे प्रतिष्ठेचे ‘सूर्यदत्त जीवनगौरव पुरस्कार’ आणि ‘सूर्यदत्त राष्ट्रीय पुरस्कार’ यांची घोषणा करण्यात आली आहे.

सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनच्या वतीने ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना ‘सूर्यदत्त जीवनगौरव पुरस्कार देण्याची घोषणा

सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनच्या वतीने संचालित सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या 28 व्या वर्धापनदिनानिमित्त दिले जाणारे प्रतिष्ठेचे ‘सूर्यदत्त जीवनगौरव पुरस्कार’ आणि ‘सूर्यदत्त राष्ट्रीय पुरस्कार’ यांची घोषणा करण्यात आली आहे. येत्या शनिवार, 7 तारखेला सायंकाळी 5.300 वाजता बाणेर येथील बंटारा भवन (मुंबई–पुणे महामार्ग) येथे भव्य समारंभात हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.

ALSO READ: बिगबॉस फेम अभिनेता अडकला लग्नबंधनात
अशी माहिती सूर्यदत्तचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ.संजय चोरडिया यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी सूर्यदत्ताच्या सहयोगी उपाध्यक्षा, मुख्य कार्यकारी अधिकारी, आणि सल्लागार समितीचे सदस्य उपस्थित होते. 

ALSO READ: लक्ष्मीकांत बेर्डे यांनी सलमान खानच्या ‘मैने प्यार किया’ या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले, विनोदाने ते प्रेक्षकांचे आवडते बनले

प्रा. डॉ. संजय चोरडिया यांनी सांगितले की, अहिंसा विश्वभारतीचे संस्थापक आचार्य डॉ. लोकेश मुनी यांच्या अध्यक्षतेखाली सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश उदय लळीत यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे माजी राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जाजू, एअरमार्शल (निवृत्त) भूषण गोखले, माजी केंद्रीय निवडणूक आयुक्त टी. एस. कृष्णमूर्ती, ज्येष्ठ अभिनेते रझा मुराद तसेच एमआयटीचे अधिष्ठाता प्रा. डॉ. शरदचंद्र दराडे उपस्थित राहणार आहेत.

ALSO READ: बिग बॉस फेम शिव ठाकरेच्या घराला आग

यंदाचा ‘सूर्यदत्त ग्लोबल पीस गांधीयन फिलॉसॉफी अवॉर्ड 2026’ पद्मश्री आचार्य डॉ. चंदनाजी महाराज (ताई माँ) यांना प्रदान करण्यात येणार आहे. तर ‘सूर्यदत्त जीवनगौरव पुरस्कार’ माजी सरन्यायाधीश उदय लळीत, ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, हास्ययोग चळवळीचे प्रवर्तक विठ्ठल काटे, माजी सनदी अधिकारी शेखर गायकवाड, अभिनेते राकेश बेदी, बांधकाम व्यावसायिक विलासकुमार पालरेषा, दिग्दर्शक सुभाष सेहगल, शिक्षणतज्ज्ञ अशोककुमार ठाकूर, शास्त्रज्ञ डॉ. आनंद भाडळकर, विधिज्ञ ॲड. प्रमोद आडकर, साहित्यिका प्रा. सुरेखा कटारिया, उद्योजक प्रकाश गांधी आणि जागतिक रणनीतीकार संजय पुरी यांना जाहीर करण्यात आला आहे.

Edited By – Priya Dixit

 

Go to Source