निवडणुकांची घोषणा आठवडाअखेरीस शक्य

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून सुरू असलेली तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. निवडणूक आयोगाने सोमवारी येथे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी नियुक्त केलेल्या निरीक्षकांसोबत एक बैठक आयोजित केली होती. याप्रसंगी देशभरातील 1,800 हून अधिक निरीक्षकांना मुख्य निवडणूक आयुक्तांनी वेगवेगळ्या विषयांवर मार्गदर्शन केले. आता चालू आठवड्याच्या अखेरीस मतदान कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. […]

निवडणुकांची घोषणा आठवडाअखेरीस शक्य

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून सुरू असलेली तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. निवडणूक आयोगाने सोमवारी येथे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी नियुक्त केलेल्या निरीक्षकांसोबत एक बैठक आयोजित केली होती. याप्रसंगी देशभरातील 1,800 हून अधिक निरीक्षकांना मुख्य निवडणूक आयुक्तांनी वेगवेगळ्या विषयांवर मार्गदर्शन केले. आता चालू आठवड्याच्या अखेरीस मतदान कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. येत्या शुक्रवारी किंवा शनिवारी मुख्य निवडणूक आयुक्त पत्रकार परिषद घेऊन निवडणूक तारखांची घोषणा करू शकतात.
सध्या निवडणूक आयोगात आयुक्तांच्या तीनपैकी दोन पदे रिक्त आहेत. निवडणूक आयोगात फक्त मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार हे एकमेव सदस्य उरले आहेत. यापूर्वी अनुप पांडे हे फेब्रुवारीमध्ये निवडणूक आयुक्त पदावरून निवृत्त झाले होते. निवडणूक आयोगातील निवडणूक आयुक्तांची दोन रिक्त पदे भरण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली लवकरच बैठक होणार आहे. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. अऊण गोयल यांनी निवडणूक आयुक्तपदाचा अचानक राजीनामा दिल्यानंतर काँग्रेस नेत्या जया ठाकूर यांनी ही याचिका दाखल केली आहे. केंद्र सरकारने निवडणूक आयुक्त (सेवा आणि व्यवसायाच्या अटी) कायदा, 2023 या नवीन कायद्यानुसार निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीला परवानगी देऊ नये, अशी मागणी करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण तात्काळ सुनावणीसाठी सूचीबद्ध करण्याचा विचार केला आहे.