अनमोड घाटमार्ग तीन महिन्यांसाठी बंद

जिल्हाधिकारी लक्ष्मीप्रिया यांचा आदेश कारवार : गोवा दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्ग रस्ता क्रमांक 4ए प्रदेशात होत असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर अनमोड रस्त्यावरील अवजड वाहनांच्या वाहतुकीवर निर्बंध घालण्याचा आदेश कारवार जिल्हाधिकारी लक्ष्मीप्रिया यांनी गुरुवारी बजावला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या या आदेशामुळे धारवाडहून जाणाऱ्या वाहनांना अळणावर, हल्ल्याळ, यल्लापूर, अंकोला मार्गे कारवारला आणि पुढे गोव्याला जावे लागणार आहे. तर बेळगावहून जाणाऱ्या वाहनांना चोर्लाघाट मार्गे […]

अनमोड घाटमार्ग तीन महिन्यांसाठी बंद

जिल्हाधिकारी लक्ष्मीप्रिया यांचा आदेश
कारवार : गोवा दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्ग रस्ता क्रमांक 4ए प्रदेशात होत असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर अनमोड रस्त्यावरील अवजड वाहनांच्या वाहतुकीवर निर्बंध घालण्याचा आदेश कारवार जिल्हाधिकारी लक्ष्मीप्रिया यांनी गुरुवारी बजावला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या या आदेशामुळे धारवाडहून जाणाऱ्या वाहनांना अळणावर, हल्ल्याळ, यल्लापूर, अंकोला मार्गे कारवारला आणि पुढे गोव्याला जावे लागणार आहे. तर बेळगावहून जाणाऱ्या वाहनांना चोर्लाघाट मार्गे गोव्याला जावे लागणार आहे. या आदेशानुसार सहा चाकी किंवा त्याहून अधिक चाकांच्या वाहनांना पाऊस संपेतोपर्यंत म्हणजे 30 सप्टेंबरपर्यंत रामनगरहून गोव्याला राष्ट्रीय महामार्ग रस्ता क्रमांक 4ए वरून वाहतूक करता येणार नाही.