अवजड वाहनांसाठी अनमोड घाट उद्यापासून 25 जानेवारीपर्यंत बंद
हलकी वाहने, दुचाकींना राहणार खुला : पर्यायी मार्ग अवलंब करण्याची सूचना
पणजी : कर्नाटक हद्दीतील लोंढा व गोवा हद्दीतील कुळे या मार्गावरील रेल्वेच्या दुहेरी ट्रॅकिंगच्या कामामुळे शुक्रवार 5 ते गुऊवार 25 जानेवारी या दरम्यान अवजड वाहनांसाठी अनमोड घाट रस्ता बंद राहणार आहे. याबाबतचा आदेश कर्नाटक जिल्हा प्रशासनाने काढला आहे. अवजड वाहनांसाठी हा घाटरस्ता बंद असला तरी हलक्या वाहनांसाठी व दुचाकींसाठी रस्ता सुरू राहणार असल्याचेही आदेशात म्हटले आहे. गोव्यात येणारी हलकी वाहने रामनगर, तिनईघाट, मरसंगल मार्गाचा वापर करू शकतात. कर्नाटककडे जाणारी वाहने अनमोड, कॅसलरॉक, चांदेवाडी जगलबेट मार्गाचा वापर करू शकतात. अनमोड घाट रस्ता 25 जानेवारीपर्यंत बंद राहणार असल्याने अवजड वाहनांना अलनावर, हल्याळ, यल्लापूर मार्गाचा वापर करावा लागणार आहे.
Home महत्वाची बातमी अवजड वाहनांसाठी अनमोड घाट उद्यापासून 25 जानेवारीपर्यंत बंद
अवजड वाहनांसाठी अनमोड घाट उद्यापासून 25 जानेवारीपर्यंत बंद
हलकी वाहने, दुचाकींना राहणार खुला : पर्यायी मार्ग अवलंब करण्याची सूचना पणजी : कर्नाटक हद्दीतील लोंढा व गोवा हद्दीतील कुळे या मार्गावरील रेल्वेच्या दुहेरी ट्रॅकिंगच्या कामामुळे शुक्रवार 5 ते गुऊवार 25 जानेवारी या दरम्यान अवजड वाहनांसाठी अनमोड घाट रस्ता बंद राहणार आहे. याबाबतचा आदेश कर्नाटक जिल्हा प्रशासनाने काढला आहे. अवजड वाहनांसाठी हा घाटरस्ता बंद असला […]
