तालुकास्तरीय वाचक स्पर्धेत कोलगावची अंकिता पाटील प्रथम

सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघ आणि श्रीराम वाचन मंदिर आयोजित स्पर्धा सावंतवाडी | प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघ व सावंतवाडी येथील श्रीराम वाचन मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय वाचक स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत प्रथम अंकिता संतोष पाटील कोलगाव ,तर द्वितीय महेश लाडू सावंत , सावंतवाडी , तृतीय सौ. प्रगती सदानंद परांजपे केसरी यांना गौरवण्यात आले […]

तालुकास्तरीय वाचक स्पर्धेत कोलगावची अंकिता पाटील प्रथम

सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघ आणि श्रीराम वाचन मंदिर आयोजित स्पर्धा
सावंतवाडी | प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघ व सावंतवाडी येथील श्रीराम वाचन मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय वाचक स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत प्रथम अंकिता संतोष पाटील कोलगाव ,तर द्वितीय महेश लाडू सावंत , सावंतवाडी , तृतीय सौ. प्रगती सदानंद परांजपे केसरी यांना गौरवण्यात आले आहे. सावंतवाडी येथील श्रीराम वाचन मंदिर येथे वाचक स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत तालुक्यातून शिक्षक व वाचनालयातील ग्रंथपाल व वाचक यांनी सहभाग घेतला. जिल्हा ग्रंथालय संघाच्या वतीने घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय स्पर्धेत उद्घाटन साहित्यिक वाचन मंदिरचे ज्येष्ठ संचालक प्रा. जी. ए बुवा यांच्या हस्ते करण्यात आले. तर बक्षीस वितरण पहिल्या तीन क्रमांकावर दोन उत्तेजनार्थ अशा पाच जणांचा रोख रक्कम प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी श्रीराम वाचन मंदिरचे अध्यक्ष प्रसाद पावसकर, सचिव रमेश बोंद्रे ,जिल्हा ग्रंथालय संघाचे सहसचिव विठ्ठल कदम ,जिल्हा ग्रंथालयाचे राज्य प्रतिनिधी भरत गावडे, जिल्हा ग्रंथालयाचे संचालक एडवोकेट,संतोष सावंत, श्रीराम वाचन मंदिरचे कर्मचारी श्री सावंत व सौ . कानसे, श्री वाडकर, म. ल .देसाई ,सागर मेस्त्री रेश्मा सावंत- पोकळे ,कृष्णा गावडे ,सौगवस आदी उपस्थित होते. यावेळी उत्तेजनार्थ वंदना बाबुराव सावंत कोलगाव, मानस राज महेश गवस बांदा ,यांनी पटकावले. या स्पर्धेत एकूण आठ जणांनी भाग घेतला होता. पहिल्या तीन क्रमांक येत्या 21 जानेवारीला होणाऱ्या जिल्हास्तरीय वाचक स्पर्धेत कुडाळ येथे सहभाग घेता येणार आहे . प्रास्ताविक भरत गावडे यांनी तर सूत्रसंचालन विठ्ठल कदम व आभार एडवोकेट संतोष सावंत यांनी मानले .